हैद्राबाद : इंस्टाग्राम पुन्हा 22 मे रोजी पहाटे बंद झाले होते. शेकडो हजारो वापरकर्त्यांनी फीडसह समस्या नोंदविल्या आहे. पहाटे इंस्टाग्रामवर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करणे, फीडमध्ये प्रवेश करणे, पोस्ट पाहणे आणि पोस्ट करणे आणि बरेच काही समस्यांना सामोरे जावे लागले होते. आज पुन्हा एका इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली असून, या समस्येमुळे लाखो वापकर्ते त्रस्त झाले आहेत. तसेच देखील गुरुवारी हजारो वापरकर्त्यांना इंस्टाग्राम अडचणींचा सामाना करावा लागला, अशी माहिती आउटेज-ट्रॅकिंग वेबसाइट डाऊनडिटेकटर डॉट कॉम (Downdetector.com) च्या हवाल्याने दिली आहे.
इंस्टाग्राम पुन्हा डाऊन :डाऊनडिटेकटर डॉट कॉमने गेल्या 24 तासांत इंस्टाग्राम आउटेजची प्रकरणे दर्शविणारे चार्ट पोस्ट केले आहे आणि त्यात लिहले आहे, की आज IST पहाटे 4:09 आसपास इंस्टाग्रामवर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना तब्बल 188,000 लोकांनी समस्या निर्माण झाल्या आणि यासंबंधीत तक्रारी या वापरकर्त्यांनी केल्या. डाऊनडिटेकटर ट्विटर ( Downdetector Twitter) अकाऊंटने ट्विट करून, वापरकर्ता सूचित करत सांगितले आहे की, इंस्टाग्राम मध्ये सकाळी 7:56 EDT पासून समस्या येत आहेत. चार्ट दाखविल्याप्रमाणे 24 तासांमध्ये वापरकर्त्यांनी समस्यांचे फोटो हे नोंदवले आहे. तसेच वापरकर्त्यांना बहुतेक इंस्टाग्राम डाउन संदेश आणि अॅपसह अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आकड्यामध्ये सांगायला गेले तर ही प्रकरणे 87 टक्के इतकी होती. तर 9 टक्के वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम वेबसाइटवर समस्येचा सामना केला आणि 4 टक्के वापरकर्त्यांनी लॉगिनमध्ये समस्या झाली होती.