महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

ChatGPT Failed In UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चॅट जीपीटीचा उडाला फज्जा - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षाचा प्रिलिम्स पेपर चॅट जीपीटीला सोडवण्यास देण्यात आला होता. मात्र चॅट जीपीटी या परीक्षेत नापास झाली आहे. त्यामुळे चॅट जीपीटीकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात मिळतात, या दाव्यातील हवा निघाली आहे.

ChatGPT Failed In UPSC
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 5, 2023, 10:38 AM IST

हैदराबाद : सध्या टेक जगात चॅट जीपीटीची मोठी लोकप्रियता आहे. टेक यूजरनी जी माहिती विचारली ती चॅट जीपीटीकडे काही सेकंदात उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र चॅटी जीपीटीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता आले नाही. चॅट जीपीटी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नापास झाल्याने चॅट जीपीटी काही सेकंदात हवी ती माहिती उपलब्ध करुन देत असल्याच्या दाव्यातील हवा निघाली आहे.

लोकसेवा आयोगाची परीक्षा जगातील सर्वात कठीण :भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही जगात सगळ्यात कठीण असल्याचे बोलले जाते. ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या चॅट जीपीटी या फिचरने काही सेकंदात आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध करुन देत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र शनिवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित केलेली परीक्षा चॅट जीपीटी पास करण्यात सपशेल अपयश आले. त्यामुळे चॅट जीपीटी आपल्याला काही सेकंदात माहिती उपलब्ध करुन देते हे खरे असले तरी चॅट जीपीटीकडे सगळीच माहिती नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले आहे. चॅट जीपीटी हे नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच झाले असून त्यानंतर आता सगळेच मानवी कामे चॅट जीपीटी करेल, अशी अफवा पसरवण्यात आली. मात्र जी माहिती चॅट जीपीटीमध्ये फिड केली जाईल तीच माहिती चॅट जीपीटीकडे उपलब्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले आहे.

चॅट जीपीटीने अमेरिकेतील अनेक परीक्षा केल्या पास :एआय चॅट बोटने अमेरिकेतील अनेक परीक्षा पास केल्या आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग परीक्षा (USMLE) आणि एमबीएच्याही काही परीक्षा चॅट जीपीटीने पास करण्यात यश मिळवले आहे. त्यासह वरिष्ठ अभियंत्यांची गुगलने डिकोडींग केलेली मुलाखत देखील चॅट जीपीटीने पास करण्यात यश मिळवले आहे. मात्र बंगळुरूतील इंडिया मॅगझिनने भूगोल, अर्थव्यवस्था, इतिहास, पर्यावरणशास्त्र आणि सामान्य विज्ञानासह चालू घडामोडींवर आधारित असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करण्यासाठी चॅट जीपीटीला विषय देण्यात आला होता. मात्र या यश मिळवण्यात चॅट जीपीटी नापास झाली आहे.

लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम्स परीक्षेतच चॅट जीपीटी नापास : या मॅगझिनने चॅट जीपीटीला लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधील प्रिलिम्स परीक्षेतील प्रश्न पत्रिकेचा एक सेट दिला होता. यामधीलसर्व १०० प्रशांची उत्तरे देणे आवश्यत होते. मात्र चॅट जीपीटी केवळ ५४ प्रशांची उत्तरे देण्यात यशस्वी झाल्याची अहवाल या मॅगझिनच्या वतीने देण्यात आला आहे. चॅट जीपीटीचे ज्ञान २०२१ पर्यंत मर्यादित असल्याने चॅट जीपीटी वर्तमान घटनांशी निगडीत घटनांची उत्तरे देऊ शकत नाही. त्यासह अर्थशास्त्र, भूगोल, या विषयांच्या विशिष्ट वेळ विशिष्ट विषयांबाबतच्या प्रशांची उत्तरे देऊ शकत नाही. मात्र तरीही चॅट जीपीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टन यांनी चॅट जीपीटी हे मर्यादित आहे, मात्र काही गोष्टींसाटी ते पुरेसे असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - ICMR On Flu : कोविडनंतर देशभरात वाढत आहेत 'या' व्हायरसचे रुग्ण, आयसीएमआरने दिला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details