नवी दिल्ली :सध्या खराब अन्नामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अन्न खराब झाले की नाही, हे कसे ओळखावे या प्रश्नांचे उत्तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थीनीने शोधले आहे. खेंगदालिऊ चावांग असे त्या भारतीय संशोधक मुलीचे नाव आहे. खेंगदालिऊ चावांग ही मुळची नागालँडची असून तिने एक छोटा आणि कमी किमतीचा अॅसिडिटी सेन्सर विकसित केला आहे. त्यामुळे अन्न खराब झाले आहे की नाही याबाबत अचूक माहिती मिळते.
काय आहे अॅसिडिटी सेन्सर :खेंगदालिऊ चावांग भारतीय तरुणी टेक्सास विद्यापीठात संशोधन करत आहे. तिने अन्न खराब झाले की नाही, याबाबतची अचूक माहिती देणाऱ्या अॅसिडिटी सेन्सरचा शोध लावला आहे. हा अॅसिडिटी सेन्सर लवचिक असून त्याची लांबी सेन्सरची लांबी फक्त दोन मिलिमीटर आणि रुंदी 10 मिलिमीटर आहे. त्यामुळे प्लॅस्टिक रॅपिंग सारख्या सध्याच्या अन्न पॅकेजिंग पद्धतींमध्ये हा डिव्हाइस टाकून अन्नाची तपासणी करणे शक्य होते. पीएच पातळी मोजण्यासाठी उद्योगात सहसा मोठे मीटर वापरतात. त्यामुळे अन्नाच्या ताजेपणाचे निरीक्षण करण्यासाठी ते प्रत्येक पॅकेजमध्ये टाकून तपासमी करणे योग्य नसल्याचे यावेळी चावांग यांनी स्पष्ट केले. आम्ही विकसित केलेले असिडीटी सेन्सर एका लहान वायरलेस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन यंत्रासारखे काम करत असल्याचेही चावांग यांनी यावेळी सांगितले. हे विमानतळांवर तपासनी करण्यासाठी वापरल्या जाण्याऱ्या यंत्रासारखेच काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
1.3 अब्ज मेट्रिक टन अन्नाची नासाडी :जगभरात अन्नाची नासाडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील अनेक नागरिकांचे पोट हे शेतीवर अवलंबून आहे. मात्र अन्नाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होते. मोठे मॉल, बंदरे, आदीच्या चेकपॉईंटवर नागरिकांची चपासमी करण्यात येते. या ठिकाणी चावांग यांनी शोधलेले अॅसिडीटी सेंसर उत्तमप्रकारे काम करु शकते, असा त्यांनी दावा केला आहे. चेक पॉईंटवर स्कॅन केलेला डाटा हा पीएच पातळी तपासल्यानंतर तो सर्व्हरला पाठवण्यात येतो. त्याची पीएच पातळी लगेच मोजून त्याचे अपडेटही देण्यात येत असल्याचे चावांग यांनी यावेळी स्पष्ट केले. दरवर्षी जगभरातील अंदाजे 1.3 अब्ज मेट्रिक टन अन्न वाया जात असल्याची माहिती युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे.
अन्नाचा अपव्यय झाल्याने वाढते कुपोषण :नागालँडमधील नागरिक मुख्यत: शेतीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र शेती योग्य रितीने पिकत नसल्याने त्यांना कुपोषणासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. नागालँडमधील कुपोषणाच्या समस्येमुळे मला अशा संशोधनाला प्रवृत्त केल्याची माहिती संशोधक चावांग यांनी दिली. अन्नाची नासाडी होत असल्याने कुपोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही चावांग यांनी सांगितले. अन्नाचा अपव्यय केवळ अन्नाची असुरक्षितता आणि अन्न उत्पादकांना नफा कमी करण्यास कारणीभूत ठरत नाही. तर अन्नाची नासाडी पर्यावरणासाठी देखील वाईट असल्याचे चावांग यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - AI news : AI मानवी दृष्टीचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरते; जाणून घ्या काय आहे डीप न्यूरल नेटवर्क