न्यूयॉर्क :भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आपल्या ज्ञानाचा डंका पिटला केला आहे. त्यांनी अमेरिकेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या विज्ञान पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. यात संगणाकाचे मॉडेल विकसित केल्याबद्दल नील मुद्गल याला अडीच लाखाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. त्याला रिजेनेरॉन विज्ञान टॅलेंट स्पर्धेत हे पारितोषिक देण्यात आले आहे. अंबिका ग्रोव्हरला सहावे स्थान मिळाले असून तिला 80 हजार डॉलर सिद्धू पचिपाला नवव्या स्थानांवर असून त्याला 50 हजार डॉलरच्या बक्षीसाने गौरवण्यात आले आहे.
लवकर निदान करणाऱ्या मॉडलचा शोध :या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलेल्या नील मुद्गल याने संगणकीय जीवशास्त्र आणि जैव सूचना मॉडेल बनवले आहे. त्याचे हे मॉडेल कर्करोग, विषाणूजन्य संसर्गाचे निदान आणि उपचारात्मक औषधांचा विकास सुलभ करण्यासाठी आरएनए रेणूचा शोध घेत असल्याचे सोसायची फोर सायन्सच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे रोगाचे निदान लवकर होण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला मानाचे पारितोषिक देण्यात आले आहे. रेजेनेरॉन फार्मास्युटिकल्सने प्रायोजित केलेली स्पर्धा आयोजित केली होती. सोसायची फाॅर सायन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील फक्त ४० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.