महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

सुपरनोवा स्फोटाच्या अभ्यासादरम्यान भारतीय संशोधकांनी शोधला अतितप्त तारा - अवकाश

डब्ल्युआर तारे हे अत्यंत तेजस्वी तारे असतात. आपल्या सूर्यापेक्षा कैकपटीने ते तेजस्वी असतात. त्यामुळे या ताऱ्यांविषयी शास्त्रज्ञांना आधीपासूनच उत्सुकता राहिल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

सुपरनोवा स्फोटाच्या अभ्यासादरम्यान भारतीय संशोधकांनी शोधला अतितप्त तारा
सुपरनोवा स्फोटाच्या अभ्यासादरम्यान भारतीय संशोधकांनी शोधला अतितप्त तारा

By

Published : Apr 9, 2021, 6:39 AM IST

नवी दिल्ली :एका अत्यंत दुर्मिळ अशा सुपरनोवा स्फोटाचा मागोवा घेत असताना भारतीय अवकाश संशोधकांनी एक अतितप्त तारा शोधून काढला आहे. वूल्फ-रायेट तारा अथवा डब्ल्युआर तारा असे या ताऱ्यांना संबोधले जाते.

डब्ल्युआर तारे हे अत्यंत तेजस्वी तारे असतात. आपल्या सूर्यापेक्षा कैकपटीने ते तेजस्वी असतात. त्यामुळे या ताऱ्यांविषयी शास्त्रज्ञांना आधीपासूनच उत्सुकता राहिल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.

या महाकाय ताऱ्यांची बाह्य हायड्रोजन पट्टीका केंद्रकातील हेलियम आणि इतर तत्वांच्या संयोजनाशी संलग्न असते.

अशा महातेजस्वी सुपरनोवा विस्फोटांचा अभ्यास अशा ताऱ्यांविषयीचे गूढ उकलण्यासाठी सहाय्यकारक ठरू शकतो.

नैनीतालमधील आर्यभट्ट निरिक्षण विज्ञान संशोधन संस्थेतील अवकाश संशोधकांनी आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांच्या मदतीने एनजीसी 7371 या आकाशगंगेतील एसएन 2015डीजे या सुपरनोवाचे ऑप्टीकल निरीक्षण केले.

सुपरनोवा स्फोटात कोसळलेल्या ताऱ्याचे वजन आणि त्याच्या उत्सर्जनाच्या भूमितीची गणना संशोधकांनी केल्याचे अॅस्ट्रोफिजिकल जर्नल या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

मूळ तारा हा दोन ताऱ्यांनी मिळून तयार झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास यादरम्यान आले. यापैकी एक तारा हा महाकाय डब्ल्युआर तारा होता. तर दुसरा तारा हा आपल्या सूर्यापेक्षा कमी वजन असलेला छोटा तारा होता.

सुपरनोवा स्फोट हे ब्रह्मांडात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन करणारे महाविस्फोट असतात.

याचे दीर्घ निरीक्षण या स्फोटांची वर्तणूक आणि याची वैशिष्ट्ये समजण्यासाठी सहाय्यकारक ठरतात.

ABOUT THE AUTHOR

...view details