न्यूयॉर्क :सध्या नागरिकांना आपल्या छोट्याशा मत्सालयात छान गोल्ड फिश असावे असे वाटते. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात छोटेशे मत्सालय असते. मात्र थायलंडमधील एका छोट्याशा मत्सालयातील पारदर्शी मासा पोहताना त्याच्या अंगावर इंद्रधनुष्य चमकत असल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे कॅटफिश प्रकारातील या माशाच्या अंगावर इंद्रधनुष्य का अवतरतो याचे शास्त्रीय कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
थायलंडच्या नदीत आढळतात कॅटफिश :कॅटफिश या थायलंडच्या नदीत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या माशांच्या अंगावर सुर्यप्रकाश पडल्यानंतर त्यांच्या अंगावर इंद्रधनुष्य चितारला जातो, असे शास्त्रज्ञांनी सोमवारी राष्ट्रीय अकादमीच्या जर्नलमध्ये प्रकाशीत केलेल्या पत्रकात याबाबतची माहिती दिली आहे. सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर हा मासा आपल्या पारदर्शी नाजूक त्वचावर असलेल्या विशिष्ट स्ट्रक्चरला हलवतो. त्यामुळे त्याच्या त्वचेवर इंद्रधनुष्य निर्माण होत असल्याचे या शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याच्या या पारदर्शी त्वचेमुळेच या माशाला ग्लास फिश असेही संबोधतात. फक्त थायलंडच्या नदीत आढळणाऱ्या या माशाची लांबी काही सेंटीमिटर लांब असल्यानेही त्या आकर्षीत असल्याचे दिसून येते.
फुलपाखराच्या पंखावरही दिसतात रंग :कॅटफिश या माशांच्याच नाहीतर इतर प्राण्यांच्या अंगावर देखील चमकणारे इंद्रधनुष्य दिसू शकते. मात्र त्यासाठी त्यांनी काहीतरी हालचाल केल्यानंतरच ते दिसून येतात. या पक्षांकडे चमकदार बाह्य पृष्ठभाग असलेली त्वचा असते. त्यामुळे त्यावर प्रकाशाचे किरण पडल्यानंतर ते परावर्तीत होतात. हमिंगबर्डचे पंख किवा फुलपाखराच्या पंखावर असे रंग दिसून येत असल्याचे ऍरिझोना स्टेट विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ रॉन रुटोव्स्की यांनी स्पष्ट केले.