न्यूयॉर्क :कोरोना विषाणूमुळे अनेक भारतीयांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर ओमिक्रॉनच्या संसर्गाने धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांना ओमिक्रॉनसह त्याच्या सबव्हेरियंटचाही सामना करावा लागला. मात्र नागरिकांनी लसीकरण केल्यानंतरही ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटच्या संसर्गाने आजार वाढवला. याबाबत संशोधकांनी ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट अँटीबॉडीजमध्ये असलेल्या किलर टी पेशी टाळून नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टी पेशी या रोगप्रतिकारक पेशी असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट टी पेशींना करतात लक्ष्य :कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेतले होते. काही नागरिकांनी तर बुस्टर डोसही घेतले आहेत. मात्र त्यानंतरही ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटने त्यांना बाधित केले. त्यामुळे ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट कसे काम करतात, याबाबत अमेरिकेच्या याले विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या संशोधनात याबाबत विश्लेषण केले आहे. या संशोधकांनी व्हायरसचे तुकडे सादर करणाऱ्या एमएचसी ( Major Histocompatibility Complex ) रेणूंची हालचाल मोजली. हे एमएचसी रेणू टी पेशींना सतर्क करतात. त्यानंतर ते रोगप्रतिकार शक्ती असलेल्या या टी पेशींना लक्ष्य करतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी एमएचसी रेणूंची क्रिया SARS CoV 2 च्या पाच ओमिक्रॉन सबव्हेरियंट विषाणूच्या पूर्वीच्या आवृत्त्यांच्या संपर्कात असलेल्या पेशींमध्ये लक्षणीयरित्या कमी होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.