महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Google Announces New Features : गूगलची मीट आणि क्रोमबुकसाठी नवीन फीचर्सची घोषणा

गूगलने Meet, Chromebook साठी नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. Meet कॉल थेट Google Doc मध्ये ऑटो ट्रान्स्क्राइब केले जाऊ शकतात. इतर कोणती नवीन फीचर्स जोडली गेली आहेत, ते जाणून घ्या.

New Features for meet Chromebook
Google

By

Published : Jun 9, 2022, 7:36 PM IST

Updated : Jun 28, 2022, 9:42 AM IST

नवी दिल्ली: शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने, टेक दिग्गज गूगलने बुधवारी घोषणा ( Google Announces New Features ) केली की, ते गूगल क्लासरुम आणि गूगल मीटसाठी नवीन अपडेट ( New update for Google Meet ) शेअर करत आहे. गूगल वर्कस्पेस फॉर एजुकेशन प्लस या टीचिंग एंड लर्निग अपग्रेडचा वापर करणाऱ्यांसाठी गूगलने सांगितले की, ते गूगल मीटमध्ये वर्गात इंटरकनेक्टिव्हिटी, नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून मीटमध्ये फीचर्स जोडत ( New Features In Google Meet ) आहे.

गूगल फॉर एजुकेशनचे संचालक शांतनु सिन्हा ( Google for Education Director Shantanu Sinha ) यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले, "आता, सुलभ मजकूर पुनरावलोकनांसाठी आणि कीवर्ड आणि संकल्पना शोधण्याच्या क्षमतेसाठी मीट कॉल ( Meet Call ) थेट गूगल डॉकमध्ये स्वयं-लिप्यंतरण केले जाऊ शकतात." गूगल ने सांगितले की वापरकर्ते आता मीटमध्ये पिक्चर इन पिक्चरसह क्रोममधील इतर टॅब नेव्हिगेट करू शकतात ( Chrome can be navigate tabs ), तर मीट कॉल मधील विद्यार्थ्यांच्या 4 टाइल्स पाहू शकतात. शिक्षक आता लाइव-स्ट्रीमवर पोल आणि प्रश्नोत्तरे आणि थेट प्रवाहात जोडू शकतात. तसेच थेट यूट्यूबवर लाइव-स्ट्रीम करु शकतात.

कंपनी M103 मध्ये नवीन वैशिष्ट्ये देखील जोडत आहे जसे की Chrome OS मध्ये तयार केलेले स्क्रीनकास्ट अॅप, जेथे वापरकर्ते गूगल ड्राइव्हवर स्वयंचलितपणे सेव्ह केलेले लिप्यंतरण केलेले स्क्रीनकास्ट रेकॉर्ड, ट्रिम, शेअर आणि पाहू शकतात. तुम्ही व्हिडिओंची सानुकूल लायब्ररी तयार करू शकता.

सिन्हा म्हणाले, "वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत आमची वैशिष्ट्ये विकसित करत आहोत." शिक्षकांची दैनंदिन कामे सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी गूगवने नवीन एकत्रीकरण आणि साधने देखील आणत आहे.

हेही वाचा -Mid Range Moto G82 5G : भारतात लॉन्च झाला मिड रेंज मोटो जी82 फाय जी स्मार्टफोन, 'या' तारखेला सुरु होणार विक्री

Last Updated : Jun 28, 2022, 9:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details