नवी दिल्ली- तुम्ही अनेकदा महत्त्वाच्या वस्तू हरवित असाल तर सॅमसंगने तुमच्यासाठी खास उत्पादन आणले आहे. कंपनी खास डिव्हाईस लाँच करणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या हरवेल्या वस्तू शोधणे शक्य होणार आहे.
गॅलक्सी स्मार्ट टॅग या सॅमसंग डिव्हाईसचे चालू महिन्यात लाँचिग होणार आहे. हे डिव्हाईस ब्ल्यूटूथला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डिव्हाईस सापडत नसेल तर शोधून काढणे शक्य होणार आहे. स्मार्ट टॅगमध्ये बदलता येवू शकणारी सेल बॅटरी असल्याची माहिती सॅमसंगने शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-चीनमध्ये तयार झालेल्या टेस्ला 'मॉडेल वाय'ची विक्री सुरू!
सॅमसंग ट्रॅकरचे फायदे-
- ब्ल्यूटुथ ट्रॅकर फोन, कीचेन अशा वस्तु शोधण्यासाठी वापरता येतो.
- हे चौरसाकृती ट्रॅकर कोणत्याही वस्तुला जोडता येते.
- तसेच त्याच्या ठिकाणाचीही माहिती कळू शकते.
- वस्तु हरविल्यानंतर त्याचे अलर्ट हे वापरकर्त्याला मिळू शकतात. सॅमसंग गॅलक्सी स्मार्ट टॅग ट्रॅकर हे चौरसाकृती आहे.