नवी दिल्ली - कोरोना महामारीचे संकट असले तरी गॅझेटची देशात मोठी मागणी वाढली आहे. ही गरज ओळखून कंपन्यांकडून विविध उत्पादने देशात सादर होत आहेत. सोनीने देशातील बाजारपेठेत १९,९९० रुपये किमतीचे नवीन प्रीमियम वायरलेस स्पीकर 'एसआरएस-आरए ३०००' लाँच केले आहे.
सोनीचा एसआरएस-आरए ३००० हा प्रीमियम वायरलेस स्पीकर हा २४ फेब्रुवारीपासून सर्व रिटेल स्टोअर्ससह काही ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. तसेच अॅमेझॉन ई-कॉमर्स पोर्टलवरूनही ग्राहकांना हा वायरलेस स्पीकर खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा-दोन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर पेट्रोल-डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ
- इतर स्पीकर्सच्या तुलनेत सोनीचे स्पीकर्स वेगळे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या स्पीकरचा आवाज हॉरिझन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही पद्धतीने पसरतो. हा स्पीकर स्पॉटिफायला सहज जोडता येतो.
- संपूर्ण रिमोट कंट्रोलसाठी डिव्हाईस हे स्पॉटिफाय अॅप जोडावे लागणार आहे.
- त्याचबरोबर गुगल असिस्टेंट आणि अॅमेझॉन एलेक्सासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे वापरकर्ते हे केवळ आवाजाने संगीत नियंत्रित करू शकतात.
- ब्लूटूथ टेक्नॉलॉजीचा वापर करून स्पीकर हे स्मार्टफोन, लॅपटॉप व टॅबलेटही जोडता येतात.
हेही वाचा-'५ जी'चे वेध; एअरटेलची क्वाकोम्नबरोबर संयुक्त भागीदारी