गॅजेट डेस्क - ब्रिटेनची कंपनी रोल्स-रॉयस जगभरात विमानाचे इंजिन आणि लग्झरी कारची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या कंपनीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक अभिनव पाऊल उचलले आहे. ही कंपनी आता एका नवीन यंत्राची निर्मिती करत आहे. cockroach ज्याच्या मदतीने विमान आणि कारच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर या यंत्राच्या मदतीने तो शोधून दुरुस्त करता येणार आहे. हे यंत्र म्हणजे आकारात अत्यंत लहान असलेले छोटे-छोटे रोबोट्स आहेत. जे दिसायला अगदी झुरळांसारखे दिसतात. cockroach रोल्स-रॉयल्सने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉकरोच १५ मि.मी लांब आहेत आणि यांचे वजन फक्त काही ग्रॅम आहे.
ETV Bharat / science-and-technology
'झुरळ' करणार विमानाच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त, जाणून घ्या... - car
ब्रिटेनची कंपनी रोल्स-रॉयस जगभरात विमानाचे इंजिन आणि लग्झरी कारची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या कंपनीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक अभिनव पाऊल उचलले आहे. ही कंपनी आता एका नवीन यंत्राची निर्मिती करत आहे. ज्याच्या मदतीने विमान आणि कारच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर या यंत्राच्या मदतीने तो शोधून दुरुस्त करता येणार आहे. हे यंत्र म्हणजे आकारात अत्यंत लहान असलेले छोटे-छोटे रोबोट्स आहेत. जे दिसायला अगदी झुरळांसारखे दिसतात.
प्रत्येक रोबोटमध्ये लहान कॅमेरे फिट करण्यात आले आहेत. हे रोबोट आजूबाजूच्या भागांचे ३ डी स्कॅनमध्ये मॅपिंग करू शकतात. यांच्या मदतीने इंजिनियर्स सहजतेने कार किंवा विमानाच्या इंजिनमधील बिघाड ओळखून त्यात लवकरच दुरुस्ती करू शकणार आहेत. रोल्स रॉयसच्या टेक्नॉलॉजी स्पेशॅलिस्ट जेम्स सेल यासंबंधी माहिती देताना म्हणाले, की हे कॉकरोच रोबोट इंजिनच्या चेंबरमध्ये घुसून उद्भवलेल्या समस्येला लवकरच दुरुस्त करतील. जर आम्ही पूर्वीच्या पद्धतीने समस्येचे निराकरण करायला गेलो तर याला किमान ५ तासांचा वेळ लागेल. पण या रोबोट्सच्या मदतीने यावर केवळ ५ मिनटात मात करता येऊ शकते. या रोबोटिक्स कॉकरोचच्या निर्मितीला आणखी २ वर्षांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर यांचा वापर इंजिनच्या दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.