भिलवाडा (राजस्थान) : चंद्रयान 3 भारताच्या चंद्र मोहिमेची तिसरी आवृत्ती बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी त्याचे लॅंडिंग करेल. ज्यामुळे पृथ्वीच्या उपग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश बनेल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार्या जागतिक शक्तींच्या यादीत भारताचा समावेश होईल. असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ मनीष पुरोहित यांनी सांगितले. त्यांनी ISRO सह इतरही महत्वपूर्ण सस्थांमध्ये यापूर्वी काम केलेले आहे.
एक ऐतिहासिक क्षण :चंद्रयान 3 च्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंगबद्दल बोलताना, चंद्रयान-2 आणि मंगळयान मोहिमेचा भाग असलेले इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मनीष पुरोहित म्हणाले, भारतीय अंतराळयान चंद्रयान 3, जे चंद्राच्याजवळ पोहोचलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी सज्ज झालंय, असे करणारा भारत हा पहिला देश बनेल. हा एक ऐतिहासिक क्षण असेल. इतर कोणत्याही देशाला असे करण्यात यश आलेले नाही. हे एक मोठ यश असेल. हे मिशन भारताला जागतिक शक्ती म्हणून मान्यता मिळवून देईल. ईटीव्ही भारतला दिलेल्या एका खास मुलाखतीत पुरोहित यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 उतरण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. या मुलाखतीचा हा संपादित भाग:
जेव्हा 'पॉवर डिसेंट' सुरू होते :पुरोहित म्हणाले, "भारताच्या महत्त्वाकांक्षी तिसर्या चंद्र मोहिमेच्या अंतराळयान चंद्रयान -3 ने चंद्राच्या कक्षा पूर्ण केल्या, ज्यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आले. जेव्हा चंद्रयान -3 चंद्रापासून 25 किमी अंतरावर असेल. 23 ऑगस्ट रोजी पृष्ठभागावर 'पॉवर डिसेंट' नावाची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत विक्रमवरील चार इंजिन सुरू केली जातील. ज्यामुळे वेग कमी होईल. या प्रक्रियेमुळे विक्रमची स्थिती देखील बदलेल.
- ऑनबोर्ड कॅमेरे सॉफ्ट लँडिंगला कशी मदत करतील - इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पुढे म्हणाले, "जेव्हा लँडर उभ्या स्थितीत असेल, तेव्हा ते लँडिंग साइटचे फोटो पाठवेल. सेन्सर्सला पृष्ठभागाची उंची कळेल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, लँडिंग साइट अनुकूल असल्यास, आम्ही सॉफ्ट लँडिंग करू. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 17 मिनिटे लागतीत."