महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Eco electric bicycle : फायरफॉक्सने भारतात पहिली इलेक्ट्रिक सायकल केली लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये - फायरफॉक्स अर्बन इको

अमेरिकन सायकल निर्माता फायरफॉक्सने (Firefox Urban Eco) आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल भारतात लाँच (Firefox launches first electric bicycle in India) केली आहे. ती अ‍ॅपद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते.

Eco electric bicycle
फायरफॉक्सने भारतात पहिली इलेक्ट्रिक सायकल केली लाँच

By

Published : Jan 11, 2023, 4:02 PM IST

हैदराबाद : फायरफॉक्स अर्बन इको असे अमेरिकन सायकल निर्माता फायरफॉक्सने भारतात लाॅंच (Firefox launches first electric bicycle in India) केलेल्या इलेक्ट्रिक सायकलचे (Firefox Urban Eco bicycle) नाव आहे. ते जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही इलेक्ट्रिक सायकल ई-सायकल दिग्गज (HNF) ने डिझाईन केली आहे. ही ई-सायकल पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे पाच तास लागतात.

जाणून घ्या ई-सायकलचे वैशिष्ट्ये : कंपनीचे म्हणणे आहे की, फायरफॉक्स अर्बन इको इलेक्ट्रिक सायकल थ्रॉटलद्वारे ताशी 25 किमी वेगाने पोहोचू शकते. 10Ah क्षमतेचा बॅटरी पॅक, 90 किलोमीटरची पेडल असिस्ट रेंज (pedal assist range of 90 km) ऑफर करण्यास सक्षम आहे. यात पाच पेडल असिस्ट मोड देखील मिळतात. कंपनीचे म्हणणे आहे की, यात फ्लॅट हँडलबार, एर्गोनॉमिक ग्रिप्स आणि दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक्स आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक सायकलमध्ये सिंगल पॉवर बटण (Single Power Button) देखील आहे.

जाणून घ्या किंमत :फायरफॉक्स अर्बन इको (Eco electric bicycle) भारतात 74,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. ई-बाईक फक्त ग्रे रंगात उपलब्ध आहे. तुम्हाला ते खरेदी करायचे असल्यास, तुम्ही ते ऑफलाइन तसेच फायरफॉक्सच्या अधिकृत वेबसाइट किंवा पेटीएमद्वारे बुक करू शकता.

शारिरिक हालचाल आणि राइडिंग शैली ट्रॅकर : अर्बन इको ही अ‍ॅप-नियंत्रित ई-बाईक आहे. ही फिट अ‍ॅपद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे, रायडर त्याचा वेग, कव्हर केलेले अंतर, बर्न झालेल्या कॅलरी आणि हृदयाची गती यांचा मागोवा घेऊ शकतो. त्यामुळे रायडरला त्याची शारिरिक हालचाल आणि राइडिंग शैली ट्रॅक करण्यास देखील मदत होते.

सीईओ काय म्हणाले : फायरफॉक्स बाइक्सचे सीईओ श्रीराम सुंदरसन म्हणाले, ई-सायकल हे शहरी वेगामध्ये भविष्याशाली ठरेल. तसेच, सर्वच पारळ्यांवर ही सायक आघाडीवर असेल असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला आहे. तसेच, आमचे मत आहे की हे एक मोठे काम आहे ते युरोपमध्ये यशस्वी झाले आहे. आता आम्हाला विश्वास आहे की ते भारतातही यशश्वी होईल. तसेच, पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये, इलेक्ट्रिक स्पेसवर लक्ष केंद्रित केले जाणार असून फायरफॉक्समध्ये, आम्ही मार्केटमधील आमच्या मेहनतीच्या जोरावर या सायकलचा विभाग वेगाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details