महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Eye Test Through WhatsApp : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार डोळ्यांची तपासणी!, जाणून घ्या कशी - व्हॉट्सअ‍ॅपवरून डोळ्यांची तपासणी

मोतीबिंदूच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकांच्या समस्या समजून घेत, स्टार्टअप कंपनी 'लागी'ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या सहकार्याने एक प्रणाली विकसित केली आहे. ज्याच्या मदतीने आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनच मोतीबिंदू ओळखता येणार आहे. ही यंत्रणा कशी काम करते, वाचा या अहवालात.

Eye Test Through WhatsApp
व्हॉट्सअ‍ॅपवरून डोळ्यांची तपासणी

By

Published : Feb 19, 2023, 2:05 PM IST

लखनऊ : जर तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास होत असेल किंवा तुमच्या वडिलधाऱ्यांना ही समस्या असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित प्रणाली विकसित झाली आहे, ज्याद्वारे डोळ्यांचे आजार शोधले जाऊ शकतात. अलीकडेच, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे झालेल्या जी 20 बैठकीत हे नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.

आतापर्यंत 1100 लोकांची तपासणी : या स्टार्टअपचे सह-संस्थापक प्रियरंजन घोष सांगतात की, ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा डोळ्यांचा त्रास होतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी न मिळाल्याने आणि रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्यांचा त्रास वाढतो. अशा परिस्थितीत कोणताही आरोग्य कर्मचारी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या रुग्णांच्या डोळ्यांचे आजार सहज शोधू शकतो. रुग्णाच्या डोळ्याचा फोटो काढताच मोतीबिंदू कळेल. या आधारे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊ शकतो. त्यांनी सांगितले की हे सॉफ्टवेअर 2021 मध्ये बनवले गेले आहे आणि आता ते मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये चालू आहे. याद्वारे आतापर्यंत 1100 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सोप्या पद्धतीने तपासणी करते.

व्हॉट्सअ‍ॅप आधारित तंत्रज्ञान कसे काम करेल? :लागी (एआय) च्या संचालक निवेदिता तिवारी यांनी सांगितले की, 'हे अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपसोबत अ‍टॅच करण्यात आले आहे, कारण व्हॉट्सअ‍ॅप जवळजवळ प्रत्येकाकडेच आहे. नंतर याचे अ‍ॅप देखील लाँच केले जाईल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नंबर तयार करण्यात आला आहे, ज्याला कॉन्टॅक्ट म्हणतात. या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आमचे तंत्रज्ञान एकत्रित केले आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोतीबिंदू स्क्रीनिंग सोल्यूशन म्हणतात. ते व्हॉट्सअ‍ॅपवर जोडून ​​आम्ही आमच्या वापरकर्त्यांना संपर्क पाठवतो'. कॉन्टॅक्ट प्राप्त होताच त्या व्यक्तीला मूलभूत माहिती विचारली जाते. व्हॉट्सअ‍ॅप बॉटद्वारे नाव, लिंग आणि इतर गोष्टी विचारल्या जातात. ही माहिती दिल्यानंतर डोळ्यांचा फोटो काढावा लागतो. फोटो चांगले व्हावा म्हणून त्याला गाईड लाईन दिली जाते. ती व्यक्ती आपला फोटो बॉटला पाठवते. फोटो प्राप्त होताच त्या व्यक्तीला मोतीबिंदू आहे की नाही हे बॉट रिअल टाइममध्ये सांगतो. यानंतर रुग्णाला डॉक्टरांकडून औषध आणि शस्त्रक्रिया करता येईल.

संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे : ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. एआय तंत्रज्ञान मानवी संवेदना कॉपी करते. हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आरोग्य सेवा डेटा वापरला जातो. चाचणीची ही पद्धत डॉक्टरांसारखी आहे. हे सर्व स्वयंचलित आहे. सुमारे 100 रुग्णांवर त्याची चाचणी केली गेली आहे, ज्यामध्ये 91 टक्के अचूकता आली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील विदिशामध्ये सुमारे 50 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात पायलट प्रोजेक्ट : सध्या मध्य प्रदेशात पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जी 20 चे सकारात्मक परिणाम आले आहेत. लवकरच त्याचा वापर उत्तर प्रदेशात होताना दिसेल. हे अगदी सोप्या पद्धतीने वापरले जाऊ शकते. त्याचे परिणाम चांगले होतील. विदिशाचे जिल्हा दंडाधिकारी उमाशंकर भार्गव यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑपरेट केले जाते. पायलट प्रोजेक्ट म्हणून नटरन ब्लॉकमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे. लोकांना जागरूक करणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. या ब्लॉकमध्ये लोकांना जागरूक केले जात आहे. येथून ट्रॅक केल्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाते. दुर्गम भागासाठी ही मोठी गोष्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉट्सअ‍ॅप ही चांगली प्रक्रिया असल्याचे वरिष्ठ नेत्रचिकित्सक डॉ.संजयकुमार विश्नोई सांगतात. ही सुविधा विशेषतः दुर्गम भागांसाठी चांगली आहे. हा डेटाबेस आहे. ज्या दुर्गम भागात सुविधा उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

हेही वाचा :Twitter safety : पैसे खर्च न करता तुमचे ट्विटर अकाउंट कसे सुरक्षित ठेवावे? ही सोपी युक्ती वापरा

ABOUT THE AUTHOR

...view details