महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Elon Musk on oil and gas production : तेल आणि गॅसचे उत्पादन वाढवणे गरजेचे - एलन मस्क - एलन मस्क

टेस्ला आणि त्याच्या इलेक्ट्रिकल वाहन व्यवसायावर इंध टंचाईचा नकारात्मक परिणाम होईल हे त्यांनी मान्य केले. गेल्या वर्षी मस्क यांनी जीवाश्म इंधनाच्या म्हणजेच तेल आणि वायूच्या वाढत्या वापरावर ( Elon Musk on oil and gas production ) चिंता व्यक्त केली होती.

Elon Musk
Elon Musk

By

Published : Mar 5, 2022, 7:49 PM IST

नवी दिल्ली : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जगातील तेल उत्पादक सरकारांना तेल आणि वायूचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले आहे. मस्क यांनी पोस्ट केले की तेल आणि वायू उत्पादनात वाढ करण्यास सांगणे कठीण आहे. परंतु, अशा प्रकारचे उत्पादन करणे आवश्यक आहे. तेल आणि वायूसाठी जग रशियावर अवलंबून आहे. यामुळे निर्माण झालेल्या टंचाईला तोंड देण्यासाठी तेल आणि वायूचे उत्पादन वाढवण्याची नितांत गरज आहे. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी दुसरा मार्ग नाही. टेस्ला आणि त्याच्या इलेक्ट्रिकल वाहन व्यवसायावर याचा नकारात्मक परिणाम होईल हे त्यांनी मान्य केले. गेल्या वर्षी मस्क यांनी जीवाश्म इंधनाच्या म्हणजेच तेल आणि वायूच्या वाढत्या वापरावर ( Elon Musk on oil and gas production ) चिंता व्यक्त केली होती.

स्पेसएक्स आणि टेस्ला सीईओं रशियन सैन्य युक्रेनमधील स्टारलिंकच्या व्यावसायिक इंटरनेट नेटवर्क सिस्टीमला लक्ष्य करू शकते. त्यांनी युक्रेनियन इंटरनेट यूजर्संना स्टारलिंकच्या इंटरनेट सावधगिरीने वापरण्याची सूचना केली. स्टारलिंक उपग्रह ही नॉन-रशियन दळणवळण प्रणाली आहे. आणि अजूनही युक्रेनच्या अनेक भागात कार्यरत असल्याने हल्ल्याचा धोका जास्त आहे. गरज असल्यास स्टारलिंकचे इंटरनेट चालू करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोकांपासून अँटेना दूर ठेवा. रशियन आक्रमणादरम्यान एलन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सने युक्रेनला स्टारलिंक टर्मिनलने भरलेला ट्रक पाठवला होता.

रशियन चॅनेलचे प्रसारण थांबवणार नाही

इलॉन मस्क यांनी अनेक देशांच्या सरकारांची विनंती फेटाळली. त्यांना रशियाचे वृत्तवाहिनी बंद करण्यास सांगण्यात आले होते. बंदुकीच्या जोरावरही आम्ही रशियन चॅनेलचे प्रसारण थांबवणार नाही, असे ट्विट इलॉन मस्क यांनी केले आहे. ते म्हणाले की SpaceX ने सायबर सुरक्षा आणि सिग्नल जॅमिंगवर प्राधान्य दिले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर Apple, Google, Microsoft, Twitter, YouTube, Meta आणि इतर अनेक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने रशियन राज्य माध्यमांच्या सामग्रीवर बंदी घातली आहे.

हेही वाचा -Meta commits $15mn to Ukraine : मेटा युक्रेनला करणार 15 कोटी रुपयांची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details