पॅरिस :खगोलशास्त्रज्ञांना दोन नवीन कृष्णविवर शोधण्यात यश आले आहे. हे कृष्णविवर पृथ्वीच्या जवळ असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या कृष्णविवरांना जीएआयए बीएच 1 आणि जीएआयए बीएच 2 अशी नावे देण्यात आली आहेत. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 1560 प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचा दावा युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. आकाशगंगेच्या दृष्टीने हे कृष्णविवर आपल्या कॉस्मिक बॅकयार्डमध्ये राहत असल्याचेही यावेळी ईएसएच्या शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
स्पेसक्राफ्टने लावला दोन कृष्णविवरांचा शोध :युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञांनी ताऱ्यांच्या हालचालींचा अभ्यास करून या दोन कृष्णविवरांचा शोध लावला. या संशोधकांनी स्पेसक्राफ्टच्या मदतीने आकाशातील ताऱ्यांच्या हालचालीतील एक विचित्र डोंबल मोठ्या वस्तूभोवती फिरत असल्याचा दावा केला. जीएआयए अब्जावधी तार्यांची स्थिती आणि हालचाल अचूकपणे मोजते. आकाशातील ताऱ्यांची हालचाल या तार्यांवर गुरुत्वाकर्षणाने प्रभाव पाडणाऱ्या वस्तूंबद्दल आवश्यक संकेत देऊ शकते असेही शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
सूर्यापेक्षा अंदाजे 10 पट आहेत मोठे :कृष्णविवराच्या या शोधासाठी जीएआयएच्या डेटाची अचूकता आवश्यक होती. कृष्णविवर त्याच्या सभोवताली फिरत असताना त्याच्या साथीदार ताऱ्याची छोटीशी हालचाल आढळून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला. इतर कोणतेही साधन असे मोजमाप करण्यास सक्षम नसल्याचेही या पथकाचे नेतृत्व करणारे युरोपियन स्पेस एजन्सीचे शास्त्रज्ञ टिमो प्रस्टी यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही कृष्णविवर सूर्यापेक्षा अंदाजे 10 पट जास्त असल्याचा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यासह ते कोणताही प्रकाश उत्सर्जित करत नसल्याचेही दिसून आले.
गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने शोधता येतात कृष्णविवर :खगोलशास्त्रज्ञांना माहीत असलेली सर्व कृष्णविवरे प्रकाशाच्या उत्सर्जनाद्वारे शोधली गेली होती. नवीन कृष्णविवर खरोखरच काळे असून ते केवळ त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने शोधले जाऊ शकतात. कृष्णविवराचे अंतर आणि त्यांच्या भोवतालच्या तार्यांच्या कक्षा या इतर ज्ञात बायनरी प्रणालींपेक्षा खूप जास्त असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. क्ष किरण प्रकाशात खूप तेजस्वी असल्याने त्यामुळे तारे शोधणे सोपे असते. हे कृष्णविवर अधिक सामान्य असल्याचा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे. या कृष्णविवरांचा क्ष किरण बायनरींपेक्षा पूर्णपणे वेगळा इतिहास असण्याची शक्यता असल्याचे मत अमेरिकेतील हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे संशोधक करीम एल बद्री यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : Apple layoffs 2023 : मेटानंतर आता अॅप्पलही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; किरकोळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड