महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Engineered Kidney : संशोधकांनी तयार केली कृत्रिम किडनी; औषधांच्या विषारीपणाचा लावणार लवकर शोध - नेफ्रॉन

दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम किडनी तयार केल्याचा दावा केला आहे. ही किडनी औषधांचा शरीरावर विपरित परिणाम किती झाला याबाबतची माहिती लवकर देणार असल्याचा दावाही या या शास्त्रज्ञांनी केला आहे.

Engineered kidney
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 1, 2023, 3:24 PM IST

नवी दिल्ली :किडनीच्या आजाराने देशभरातील अनेक नागरिक त्रस्त असून किडनीच्या आजाराने अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. आता मात्र दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम किडनी तयार केली आहे. त्यामुळे औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया यामुळे लवकर ओळखता येतात. किडनीतील मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक हे एक नेफ्रॉन आहे. त्यामध्ये ग्लोमेरुलस नावाच्या लहान रक्तवाहिन्यांचे एकमेकांशी जोडलेले नेटवर्क समाविष्ट आहे. हे ग्लोमेरुलर कॅप्सूलसह किडनी तयार करत असल्याचेही या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

किडनीच्या ग्लोमेरुलर युनिटची यशस्वी प्रतिकृती :या शास्त्रज्ञांनी ग्लोमेरुलर मायक्रोवेसेल चिप तयार केली आहे. यामध्ये ग्लोमेरुलर एंडोथेलियल पेशी, पोडोसाइट लेयर्स आणि ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन (GBM) यांचा समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे (POSTECH) प्राध्यापक डोंग वू चो यांनी दिली आहे. आम्ही किडनीच्या ग्लोमेरुलर युनिट्सची यशस्वीपणे प्रतिकृती तयार केली आहे. ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ड्रग स्क्रीनिंग आणि नेफ्रोटॉक्सिसिटी चाचणीसाठी अमर्याद क्षमता देते असेही प्राध्यापक डोंग वू चो यांनी स्पष्ट केले. हे संशोधन बायोफॅब्रिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

नेफ्रॉन आहे विष दाखवणारा पहिला अवयव :या शास्त्रज्ञांनी तयार केलेली किडनी विविध प्रकारच्या विषारी पदार्थाची माहिती देण्यात तत्पर आहे. किडनी चयापचय रक्तप्रवाहातील विषारी पदार्थ काढून टाकते. शरीरात होमिओस्टॅसिस राखते असेही या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. काही औषधांद्वारे किडनीत विषारीपणा प्रवृत्त केला जाऊ शकतो. मात्र जास्त प्रमाणात औषधे शरीरात दिल्यानंतर नेफ्रॉन हा औषधाचा विषारीपणा दाखवणारा पहिला अवयव असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

कृत्रिम किडनी तयार करणे मोठे आव्हान :प्रत्यक्षात औषध देण्याआधी औषधांमुळे किती विष निर्माण होते, याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम अवयव विकसित केले जात आहेत. पॉडोसाइट्स आणि GBM प्रथिने यांच्यातील सूक्ष्म प्रक्रियेनंतर प्रथिने सोडण्याची ग्लोमेरुलसची हार्ड टू एम्युलेट क्षमता असते. मात्र त्यामुळे किडनीचे अभियांत्रिकीकरण करणे हे एक आव्हान असल्याचेही यावेळी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांनी ग्लोमेरुलर मायक्रोवेसेल ऑन ए चिप यशस्वीरित्या तयार केली. ग्लोमेरुलर एंडोथेलियल पेशी, पॉडोसाइट लेयर्स आणि जीबीएमची जटिल मांडणी एकाच टप्प्यात केली. ही चिप मोनोलेयर ग्लोमेरुलर एंडोथेलियम आणि पॉडोसाइट एपिथेलियमच्या परस्परसंवादाला परवानगी देते. त्यामुळे GBM प्रथिने तयार होतात आणि ग्लोमेरुलर पेशींची परिपक्व कार्यक्षमता प्रदर्शित होत असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - Indian Origin Robotics Engineer : नासाने स्थापन केले चंद्र ते मंगळ कार्यक्रमासाठी कार्यालय, भारतीय वंशाचा रोबोटिक्स अभियंता करणार नेतृत्व

ABOUT THE AUTHOR

...view details