महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

''मी तुझं ट्विटर खाते चालवत नाही'', इलॉन मस्क यांनी केली पुण्याच्या तंत्रज्ञाची मस्करी - Pranay Pathole

इलॉन मस्क ( Elon Musk ) यांना अधिक सीमा शुल्कामुळे टेस्ला भारतात लॉन्च करण्याची इच्छा नाही. असे असले तरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणार्‍या पुणे येथील प्रणय पाठोळे ( Pranay Pathole ) यांना यासंबंधीची उत्तरे द्यायला आवडते.

इलॉन मस्क
इलॉन मस्क

By

Published : May 23, 2022, 5:06 PM IST

नवी दिल्ली - इलॉन मस्क ( Elon Musk ) यांना अधिक सीमा शुल्कामुळे टेस्ला भारतात लॉन्च करण्याची इच्छा नाही. असे असले तरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणार्‍या पुणे येथील प्रणय पाठोळे ( Pranay Pathole ) यांना यासंबंधीची उत्तरे इलॉन मस्क ट्विटरवर नियमितपणे देतात.

सोमवारी इलॉन मस्क यांनी सांगितले की, ''ते पाठोळे यांचे ट्विटर अकाउंट चालवत नाहीत.' प्रणय पाठोळे यांचे 1.6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, त्यांनी ट्विट केले: "अनेक लोकांना असे वाटते की इलॉन मस्क माझे ट्विटर खाते चालवतो. आणि ते खरे आहे. तो खूप व्यग्र माणूस आहे, रॉकेट बनवतो, भविष्यातील इलेक्ट्रिक वाहने बनवतो, बोगदे खोदतो आणि कसा तरी त्याला अनेक ट्विट खाती चालवायला वेळ मिळतो. होय."

यावर मस्कने उत्तर दिले: "हाहा, माझ्याकडे बर्नर ट्विटर खाते देखील नाही! माझ्याकडे एक सिक्रेट इन्स्टाग्राम खाते आहे, म्हणून मी मित्रांनी मला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू शकतो."

मस्क आणि पाठोळे हे ट्विटरवर मित्र आहेत आणि टेस्लाचे सीईओ त्यांच्या ट्विटला नियमितपणे उत्तरे देण्यास सहसा टाळाटाळ करीत नाहीत. 2018 मध्ये, मस्कने पहिल्यांदा पाठोळे यांना उत्तर दिले आणि तेव्हापासून त्यांच्यात शब्दांची देवाणघेवाण सुरू आहे. ते आता ट्विटरवर डायरेक्ट मेसेजेस (DMs) द्वारे बोलतात.

प्रणय पाठोळे यांच्या GitHub प्रोफाइलमध्ये त्यांचे वर्णन एक मशीन लर्निंग (ML) अभियंता आणि "ट्विटरवर स्पेस आणि रॉकेट्सबद्दल तरबेज आहे." मस्कला भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी अशी पाठोळे यांची इच्छा आहे.

हेही वाचा -Bill Gates Smartphone : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हा स्मार्टफोन वापरतात

ABOUT THE AUTHOR

...view details