हैदराबाद : ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्याबाबत एलन मस्क यांनी मोठी घोषणा केली होती. एक एप्रिलपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार होते. मात्र त्यानंतर एलन मस्क यांनी ट्विट करत 20 एप्रिलपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एलन मस्क यांनी दिलेली मुदत आजपासून संपली आहे. त्यामुळे आजपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार आहे.
आजपासून हटवण्यात येणार ब्लू टिक :ट्विटरची मालकी घेतल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले होते. त्यानंतर त्यांनी ट्विरच्या ब्लू टिक वापरकर्त्यांना मोठा झटका दिला होता. त्यांनी ब्लू टिकसाठी यापुढे वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केल्याने अनेक वापरकर्त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र ब्लू टिक हवे असल्यास पैसे मोजावे लागतील, यावर एलन मस्क ठाम राहिले. त्यांनी अगोर एक एप्रिलपासून ब्लू टिक मार्क काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 12 एप्रिलला एक ट्विट करत 20 एप्रिलपासून ट्विटरच्या वापरकर्त्यांच्या खात्यावरुन ब्लू टिक मार्क काढून टाकण्याची घोषणा केली होती.