महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Elon Musk announced : मस्क यांच्या मतचाचणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे.

Donald Trumps return on Twitter Elon Musk announced
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा परतले ट्विटरवर

By

Published : Nov 20, 2022, 10:33 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा (Donald trump) एकदा ट्विटरवर परतले आहेत. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विट करून याची घोषणा केली. एक दिवसापूर्वी, मस्कने (Elon Musk) ट्विटरवर वापरकर्त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करावे का, असे विचारले होते. मतदानाच्या निकालांबद्दल बोलताना, 52 टक्के लोकांनी ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करण्याची मागणी केली. तर 48 टक्के लोकांनी विरोध दर्शवला.

ट्रम्प यांचे खाते पूर्ववत करण्याबाबत माहिती : एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'जनतेने त्याचे उत्तर दिले आहे... ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित केले जाईल.' तत्पूर्वी, त्यांनी प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करायचे का, असे विचारले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते का सस्पेंड करण्यात आले? :ट्रम्प यांच्यावर ट्विटरवर (Twitter Account) बंदी का घालण्यात आली? डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते का सस्पेंड करण्यात आले हे जाणून घ्या. खरे तर, 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटलमध्ये दंगल झाली होती आणि यासाठी काही प्रमाणात डोनाल्ड ट्रम्प जबाबदार होते. दंगलीतील त्याच्या भूमिकेबाबत अमेरिकेतही चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, तो आपल्या समर्थकांशी मुख्यतः ट्विटरद्वारे बोलत असे आणि यामुळेच दंगलीनंतर त्याला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सोशल नेटवर्किंग अ‍ॅप ट्रुथ सोशलवर सक्रिय आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details