नवी दिल्ली :स्किझोफ्रेनिया रुग्णांच्या झोपेचे वारंवार खोबरे होऊन अनेकांना यामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागतो. याबाबत स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा (एसएसडी) हा त्रास निवासी आणि बाह्यरुग्ण अशा दोन्ही रुग्णांमध्ये होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अनियंत्रित संक्रमणांसह रूग्णांमध्ये कठोर दिनचर्येमुळे हा त्रास होत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पिट्सबर्ग आणि इटली विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
एसएसडीने ग्रस्त नागरिकांना झोपेचा होतो त्रास :स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या नागरिकांना योग्य विश्रांती आणि अनियंत्रित संक्रमणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नागरिकांमध्ये झोप वारंवार खंडीत होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन मॉलिक्युलर सायकियाट्री जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात एसएसडी असलेल्या रुग्णांमध्ये विश्रांती आणि दैनंदिन कामात व्यत्यय आणि अनियमिततेचे नमुने वर्णन केले आहेत. एसएसडीने ग्रस्त असलेल्या लोकांना झोप येण्यास त्रास होतो. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीशिवाय इतर नागरिकांपेक्षा कमी विश्रांती मिळत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.