वॉशिंग्टन :Dell ने नवीन XPS 15 आणि XPS 17 Windows इंटेल चिप्स लाँच केले आहेत. यात Intel चे Alder Lake-H 12-gen प्रोसेसर असतील. GSM Arena ने दिलेल्या वृत्तानुसार, यात तीन नवीन CPU पर्याय उपलब्ध आहेत. Core i5-12500H, Core i7-12700H आणि Core i9-12900HK.
यात तुम्ही 64GB पर्यंत कॉन्फिगर करू शकता. यात तुम्हाला DDR5-4800 RAM स्टोरेज मिळेल. हे PCIe4 x4 SSD प्रकारातील असेल आणि 4TB पर्यंत तुम्ही तुमची मेमरी वाढवू शकता. यात तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या रंगात फिनीशिंगमध्ये मिळेल. हे चिप्स 3840 x 2400px IPS टचस्क्रीन या दोन्ही प्रकारात मिळेल. त्याचबरोबर 1920 x 1200px नॉन-टच आवृत्त्यांचा पर्याय असेल. 15-इंच मॉडेल 3456 x 2160px रिझोल्यूशनच्या OLED डिस्प्लेसह कॉन्फिगर केले जाऊ शकतात.