वॉशिंग्टन : नासाचा NASA उपग्रह रेउवेन रामाटी हाय एनर्जी सोलर स्पेक्ट्रोस्कोपिक इमेजर (RHESSI) हा मृत झाला आहे. प्रक्षेपणानंतर तब्बल 21 वर्षांनी तो पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यामुळे मानवाला कोणताही धोका नसल्याचे अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे. 2002 मध्ये लाँच करण्यात आलेल्या रेशीने RHESSI त्याच्या पृथ्वीच्या कक्षेतून सौर फ्लेअर्स आणि कोरोनल मास उत्सर्जनाचे निरीक्षण केले. त्यामुळे शास्त्रज्ञांना शक्तिशाली उर्जेचे स्फोट कसे तयार होतात, याबाबतची माहिती समजण्यास मदत झाली. नासाने 16 वर्षांनंतर 2018 मध्ये अडचणींमुळे हा उपग्रह रद्द केला होता.
उपग्रहामुळे होणार नाही हानी :उपग्रहाचे निरीक्षण करणार्या यूएस डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार हा उपग्रह बुधवारी रात्री 9:30 वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल अशी माहिती दिली आहे. या उपग्रहाचे वजन 660 पौंड असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बुधवारी उपग्रहामुळे पृथ्वीवरील कोणालाही हानी पोहोचण्याचा धोका कमी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या उपग्रहाने ऑर्बिटल सायन्सेस कॉर्पोरेशन पेगासस एक्स एल रॉकेटवर उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन्सची प्रतिमा तयार करण्याच्या मोहिमेसह प्रक्षेपित केले. या उपग्रहाने इमेजिंग स्पेक्ट्रोमीटरने साध्य केले. त्याने सूर्यापासून क्ष किरण आणि गॅमा किरण रेकॉर्ड केले आहेत. रेशीने RHESSI पूर्वी सौर ज्वालांच्या गॅमा किरण प्रतिमा घेतल्या गेल्या नसल्याचेही यावेळी नासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.