महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Cryptocurrency Mining Banned : खर्च १४ हजार, नफा २ लाखांचा.. क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगला 'या' देशात बंदी.. - क्रिप्टो मायनिंगसाठी विजेचा वापर

कमी खर्चात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या आभासी चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगवर युरोपातील कोसोवो या देशाने बंदी घातली ( Cryptocurrency Mining Banned In Kosovo ) आहे. मायनिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होत ( Electricity Used In Crypto Mining ) असून, त्यामुळे या देशाला विजेच्या टंचाईचा सामना करावा लागला ( Electricity Shortage In Kosovo ) आहे. त्यामुळे ही बंदी आहे.

क्रिप्टोकरन्सी मायनिंग
क्रिप्टोकरन्सी मायनिंग

By

Published : Jan 5, 2022, 7:57 PM IST

Updated : Jan 5, 2022, 8:03 PM IST

वृत्तसंस्था : युरोपातील कोसोवो देशाच्या सरकारने आभासी चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगवर बंदी घातली ( Cryptocurrency Mining Banned In Kosovo ) आहे. क्रिप्टोकरन्सी मायनिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर ( Electricity Used In Crypto Mining ) होतो. त्यामुळे मध्यंतरी कोसोवो देशात विजेच्या संकटाचा सामना करावा लागला ( Electricity Shortage In Kosovo ) होता. त्यामुळे सरकारने ही बंदी घातली आहे.

देशात मिळते स्वस्त वीज

कोसोवो या देशात वीज अत्यंत स्वस्त आहे. त्यामुळे कोसोवोमधील अनेक तरुण क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगमध्ये गुंतले आहेत. विजेचा जास्त वापर झाल्याने कोळशावर आधारित असलेले पॉवर प्लांट बंद पडले होते. तसेच जास्त किमतीत कोळशाची आयात या देशाला करावी लागली होती. या देशाला रशियाकडून गॅसचा पुरवठा होतो. बाल्कन राज्यातील सर्वात मोठा कोळशावर चालणारा वीज प्रकल्प गेल्या महिन्यात तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला होता. ज्यामुळे सरकारला उच्च दराने वीज आयात करावी लागली.

६० दिवसांची आणीबाणी

म्हणूनच सरकारने डिसेंबरमध्ये ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. कोविड-19 साथीच्या आजारातून अर्थव्यवस्था सावरत असताना रशियाकडून कमी पुरवठा आणि नैसर्गिक वायूची उच्च मागणी यासह विविध कारणांमुळे संपूर्ण युरोपमध्ये ऊर्जेच्या किमती गगनाला भिडत आहेत. डिसेंबरमध्ये घोषित केलेल्या 60 दिवसांच्या आणीबाणीच्या स्थितीने सरकारला ऊर्जा आयातीसाठी अधिक पैसे वाटप करण्याचे आणि वीज वापरावर कठोर निर्बंध लादण्याचे अधिकार दिले.

युरोपात गॅसच्या किमती वाढल्या

रशियाकडून कमी पुरवठा झाल्यामुळे युरोपीय गॅसच्या किमती मंगळवारी 30 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. डिसेंबरमध्ये, कोसोवोने 60 दिवसांसाठी आणीबाणीची स्थिती घोषित केली. ज्यामुळे सरकारला ऊर्जा आयातीसाठी अधिक पैसे वाटप, अधिक वीज कपात आणि कठोर उपाय लागू करता येतील.

खर्च १४ हजार, नफा २ लाखांचा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिप्टोकरन्सी मायनिंग करण्यासाठी ४० GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) असल्यास, विजेसाठी दरमहा सुमारे 170 EUR (अंदाजे रु. 14,300) खर्च होतात. याउलट क्रिप्टोकरन्सी मायनिंगमधून मायनिंग करणाऱ्याला सुमारे EUR 2,400 (अंदाजे रु. 2 लाख) नफा होतो.

४० टक्केहून अधिक ऊर्जेची आयात

कोसोवो या देशाची लोकसंख्या अवधी 1.8 दशलक्ष इतकी आहे. हा देश सद्यस्थितीत 40 टक्क्यांहून अधिक ऊर्जेची आयात करत आहे. कोसोवोमध्ये सुमारे 90 टक्के ऊर्जा उत्पादन हे लिग्नाइटपासून होते. हा एक मऊ कोळसा आहे जो जाळल्यावर विषारी प्रदूषण निर्माण करतो. त्यामुळे प्रदूषणाची समस्याही निर्माण होत आहे.

Last Updated : Jan 5, 2022, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details