नवी दिल्ली -भारतीय ग्राहकांसाठी नवीन टीव्ही जुलैमध्ये लाँच होणार आहे. आयटेलकडून नवीन ४के अँड्राईड टीव्ही हा लाँच होणार आहे. या टीव्हीची काही खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत.
गतर्षी आयटेलने टीव्हीच्या उत्पादनात प्रवेश केला. तेव्हापासून कंपनीकडून सातत्याने टीव्ही लाँच केले जात आहेत. आयटेलच्या आय श्रेणीला बाजारात चांगले यश मिळाल्याचे सूत्राने सांगितले. कारण त्यामध्ये चांगले तांत्रिक फिचर देण्यात आले होते.
हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार 'डेल्टा व्हेरीएन्ट'? रत्नागिरी, जळगावात सर्वाधिक रुग्ण
ही आहेत ४के अँड्राईड टीव्हीची वैशिष्ट्ये
- आयटेलचा नवीन ४के अँड्राईड टीव्हीला मोठा स्क्रीन आणि अल्ट्रा ब्राईट डिसप्ले आहे.
- हा टीव्ही ५५ इंचचा असण्याची शक्यता आहे. उद्योगातील सुत्राच्या माहितीनुसार टीव्हीचा आकार कमीदेखील असू शकतो.
- टीव्हीमध्ये अधिक चांगले प्रोससर, शक्तिशाली साउंड, नवीन अँड्राईड व्हर्जनबरोबरच २४ वॅट डॉल्बी ओडिओ यंत्रणा आहे.