हैदराबाद - सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याला नोकरीच्या अनेक जाहिराती पहायला मिळतात. यामध्ये नामांकित कंपनींचा देखील सहभाग असतो. अनेक तरुण या जाहिरातींवर विश्वास ठेवून अर्ज करतात. स्वत:चे कागदपत्रे, बँकेचा तपशील, आधार क्रमांक तसेच काहीजण पैशाचा डीडी देखील भरतात. त्यानंतर काही दिवसांनी समजतं की हा फ्रॉड होता.
सध्या असाच एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अॅमेझॉन या नामांकित कंपनीत भरती प्रक्रिया होत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र महाराष्ट्र सायबर क्राईमने याचा खुलासा करत ही जाहिरात फेक असल्याचे ट्विट केले आहे. तसेच अशा जाहिराती काढणाऱ्या सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि आपण घ्यावयाची काळजी याविषयीचे मार्गदर्शन देखील केलेले आहे.