महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

चीनच्या झुरॉंग रोव्हवरने मंगळावरून पाठविला पहिला सेल्फी - NASA's Perseverance on Mars

अमेरिकेच्या नासाने पहिले रोव्हर मंगळावर उतरविले. त्यानंतर चीननेही ही कामगिरी केली आहे. झुरॉंगने पाठविलेल्या टुरिंग ग्रुप फोटोमधून रोव्हर फिरत असल्याचे दिसत आहे.

झुरॉंग रोव्हर
झुरॉंग रोव्हर

By

Published : Jun 12, 2021, 4:43 PM IST

Updated : Jun 12, 2021, 5:06 PM IST

बीजिंग -मंगळावर पोहोचलेल्या चीनच्या झुरॉंगने लँडिंग होत असतानाचे सुंदर सेल्फी पाठविले आहेत. रोव्हर व जमिनीच्या भुपृष्ठाची छायाचित्रे पहिल्यांदाच झुरॉंगने पाठविली आहेत. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने (सीएनएसए) टूर ग्रुप फोटोज या नावाने मंगळाची स्थुलभूमीचे (टोपोग्राफी) फोटो प्रसिद्ध केले आहेत.

अमेरिकेच्या नासाने पहिले रोव्हर मंगळावर उतरविले. त्यानंतर चीननेही ही कामगिरी केली आहे. झुरॉंगने पाठविलेल्या टुरिंग ग्रुप फोटोमधून रोव्हर फिरत असल्याचे दिसत आहे. या रोव्हवरच्या तळाच्या स्वतंत्र कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेरामधून फोटो काढण्यात आली आहेत. स्वतंत्र असलेल्या कॅमेरामधून रोव्हरची हालचाल टिपण्यात आली आहे.

हेही वाचा-जीएसटी परिषद : कोरोना लशींवरील जीएसटी दर 'जैसे थे'; उपकरणांवरील करात कपात

असे आहे रोव्हर-

झुराँग हे २४० किलोचे असून त्याला सहा चाके आहेत. त्याची डिझाईन ही निळ्या फुलपाखरूसारखी आहे. हे रोव्हर सुमारे तीन महिने टिकू शकेल, अशी चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेची अपेक्षा आहे. झुराँगने मंगळावरील फोटो आणि दोन व्हिडिओ यापूर्वी पाठविले आहेत.

झुरॉंग रोव्हर

हेही वाचा-जीएसटी परिषदेची आज बैठक; कोरोना लशींसह औषधांवरील जीएसटीबाबत होणार निर्णय

चीनची महत्त्वाकांक्षी योजना

अवकाश संशोधनाबाबत चीन सध्या मोठ्या योजनांवर काम करत आहे. काही अंतराळवीरांसह एक ऑर्बिटल स्टेशन अंतराळात सोडण्याच्या योजनेवर चीन सध्या काम करत आहे. यासोबतच, चंद्रावर मानव उतरवण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. २०१९मध्ये चंद्राच्या दुर्गम भागात एक स्पेस प्रोब लँड करणारा चीन पहिलाच देश ठरला होता. तसेच, १९७० नंतर पहिल्यांदाच गेल्या डिसेंबरमध्ये चीनने चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणले होते.

हेही वाचा-अॅमेझॉनसह फ्लिपकार्टचा सीसीआयकडून होणार तपास; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

चिनी अग्निदेवतेच्या नावावरून ठेवले रोव्हरचे नाव

भारतीय प्रमाणवेळेनुसार हे रोव्हर २३ मे रोजी सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी मंगळावर उतरले. हे रोव्हर सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर चालते. चिनी अग्निदेवता 'झुरॉंग'चे नाव या रोव्हरला देण्यात आले आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर अवकाशयान उतरवणारा चीन हा दुसराच देश ठरला आहे. हे रोव्हर मंगळावर ९० दिवस फिरणार आहे. या कालावधीमध्ये ते मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेणार आहे.

Last Updated : Jun 12, 2021, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details