नवी दिल्ली : चॅट जीपीटीने टेक जगतात धुमाकूळ घातला असून चॅट जीपीटी हे प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देऊ शकते. आगामी काळात चॅट जीपीटी कोणत्याही क्षेत्रात मोठे कार्य करू शकत असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. ओपनएआयचे चॅट जीपीटी लेख लिहू शकते. त्यासह ते मानवासोबत गप्पा मारू शकते. आता तर आरोग्य सेवा पूर्णपणे बदलण्याची क्षमता चॅट जीपीटीमध्ये असल्याचे गुरुवारी कंपनीने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्लोबल डेटा या डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनीच्या अहवालात चॅट जीपीटी तंत्रज्ञान क्रांतीकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
चॅट जीपीटी डॉक्टरांनाही ठरणार उपयुक्त :चॅट जीपीटीचा वापर डॉक्टरांना व्यवस्थापनाच्या कामात मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. रुग्णांना देण्यात येणारी पत्रे देण्यात चॅट जीपीटी मदत करुन शकते. त्यासह डॉक्टर रुग्णांच्या परस्पर संवादावर अधिक वेळ घालवून रुग्णांची माहिती घेऊ शकतील. चॅटबॉट्समध्ये प्रतिबंधात्मक काळजी, लक्षणे ओळखणे आणि पुनर्प्राप्तीनंतरची काळजी या प्रक्रियेची परिणामकारकता आणि अचूकता वाढवण्याची क्षमता असल्याचे ग्लोबलडेटाच्या वैद्यकीय उपकरण विश्लेषक टीना डेंग यांनी स्पष्ट केले आहे. चॅट जीपीटीचे 2022 ते 2030 पर्यंत 21 टक्के कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR) असेल. 2030 मध्ये एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मार्केट 383.3 अब्ज डॉलर असेल असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाच्या आजारात ठरणार उपयुक्त :कोरोनाच्या आजारात डॉक्टरांना रुग्णांना वारंवार भेटणे शक्य नाही. अशावेळी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान संपर्करहित तपासणीसाठी चॅट जीपीटी उपयुक्त ठरणार आहे. त्यासह लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चॅटबॉट्स विकसित करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे. चॅटबॉट्स वैद्यकीय उत्पादनांबद्दल रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, असेही यावेळी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये एआय AI रुग्णांशी संवाद साधू शकते. चॅट जीपीटी हे रुग्णाच्या लक्षणांचे पुनरावलोकन करू शकते. त्यानंतर निदान, सल्ला आणि व्हर्च्युअल चेक इन किंवा हेल्थकेअर प्रोफेशनलला समोरासमोर भेट यांसारख्या विविध पर्यायांची शिफारस करू शकत असल्याने चॅट जीपीटी हे वैद्यकीय क्षेत्रातही महत्वाची भूमीका बजावू शकते. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होऊ शकतो. त्यासह रुग्णावर उपचाराची कार्यक्षमता वाढून आरोग्य सेवेवरील खर्च वाचू शकत असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.