हैदराबाद : चंद्रयान ३ ने बुधवारी (16 ऑगस्ट) चौथ्यांदा आपली कक्षा बदलली. इस्रोने सांगितले की हे वाहन आता चंद्राच्या 153 किमी X 163 किमीच्या जवळपास वर्तुळाकार कक्षेत आले आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयानचे थ्रस्टर काही काळासाठी उडवले. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ही माहिती दिली आहे. यापूर्वी चंद्रयान ३ हे 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत होते. यासह वाहन हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाकडे जात आहे. इस्रोसाठी 17 ऑगस्ट हा चंद्रयानासाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी इस्रो चंद्रयान ३चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल आणि 23 ऑगस्टला हे वाहन लँडरवर उतरेल.
- 14 दिवस घेतला जाईल चंद्राचा शोध : लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे 14 दिवस प्रयोग आणि संशोधन करतील. इस्रोने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तयारी करण्याची वेळ आली आहे कारण प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल त्यांच्या स्वतंत्र प्रवासासाठी तयार होत आहेत.
चंद्रयानाने पृथ्वीचे चित्र पाठवले होते :10 ऑगस्ट रोजी इस्रोने माहिती दिली होती की चंद्रयानाच्या लँडर इमेजर (LI) कॅमेराने पृथ्वी आणि चंद्राचा फोटो पाठवला आहे. चंद्रयान ३ चंद्राच्या तिसर्या कक्षेत पोहोचल्याच्या एका दिवसानंतर लँडर हॉरिझॉन्टल वेलोसिटी (LHVC) कॅमेऱ्याने हा फोटो काढला होता. चंद्रयान ३ मिशन 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. तेव्हापासून चंद्रयान ३ एकामागून एक टप्पे पार करत आहे. त्याचवेळी चंद्रयान ३ ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात पकडण्यासाठी वाहनाचा वेग कमी करण्यात आला. वेग कमी करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वाहनाचा चेहरा वळवला आणि 1835 सेकंद म्हणजे सुमारे अर्धा तास थ्रस्टर उडवले.