नवी दिल्ली :भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रयान 3 मोहीम ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. तसेच त्या म्हणाल्या की, आज होणाऱ्या चंद्रयान 3 च्या लॅंडिंगसाठी मी खूप उत्सुक आहे.
- संध्याकाळी थेट प्रसारण: विल्यम्स यांनी त्यांच्या दोन मोहिमांमध्ये सुमारे 322 दिवस अंतराळात घालवले आहेत. चंद्रयान 3 चंद्रावर उतरल्याने त्याच्या इतिहासाची माहिती मिळेल, असे त्या म्हणाल्या. नॅशनल जिओग्राफिक इंडिया हे या कार्यक्रमाचे थेट कव्हरेज करणार आहे. त्यात अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञ तसेच विल्यम्स आणि राकेश शर्मा यांसारख्या अंतराळवीरांचा मोहिमेला पाठिंबा असेल. तसेच इस्रोच्या म्हणण्यानुसार, लँडर आज संध्याकाळी 5:45 वाजता चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल आणि सुमारे 6.05 वाजता चंद्रावर उतरेल. चंद्रयान 3 चे यश भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.
- इस्रो घडवणार इतिहास :चंद्रयान 3 मोहीम इस्रोसाठी महत्वाची ठरणार आहे. चंद्रयान 3 या मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता फक्त त्याच्या चंद्रावर उतरण्याची प्रतीक्षा तेवढी बाकी आहे. इस्रो आज सायंकाळी 06.04 वाजता इतिहास घडवण्यास सज्ज झाले आहे.
- चंद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारताला मिळणार 'हा' सन्मान : भारताची चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला उतरता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे चंद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारताची अंतराळात निर्विवाद सत्ता प्रस्थापित होईल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणे आव्हानात्मक आहे. मात्र इस्रोने हे शिवधनुष्य पेलले आहे. चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका, चीन, रशिया यांच्या यादीत स्थान मिळवणार आहे.
हेही वाचा :