महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Chandrayaan 3 landing : नासाच्या उपग्रहाने घेतले चंद्रयान-३ च्या लँडिंग साइटचे फोटो.... - Lunar Reconnaissance Orbiter

Chandrayaan 3 landing : अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने चंद्रयान-3 लँडिंग साइटचे फोटो घेतले आहेत. 23 ऑगस्ट रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर हे यान सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. 23 ऑगस्ट रोजी, भारताचे चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आणि ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिला देश बनला.

Chandrayaan 3 landing
चंद्रयान ३ लँडिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 5:51 PM IST

हैदराबादChandrayaan 3 landing : इस्रोने पाठवलेल्या चंद्रयान 3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. तेव्हापासून चंद्राचे अनेक फोटो समोर आले आहेत. आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने चंद्रयान 3 लँडिंग साइटचे फोटो घेतले आहेत. 23 ऑगस्ट रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर हे यान सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. चंद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे.

विक्रम लँडरचे फोटो: नासा ऑर्बिटरला जोडलेल्या कॅमेऱ्याने चार दिवसांनंतर विक्रम लँडरचे फोटो (42-डिग्री स्ल्यू अँगल) घेतले. 18 जून 2009 रोजी प्रक्षेपित झालेल्या, नासा ऑर्बिटरने आतापर्यंत भरपूर डेटा गोळा केला आहे. या ऑर्बिटरने चंद्रावरील खूप महत्वाची माहिती आत्तापर्यंत आपल्याला मिळवून दिली आहे. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर/अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीने हा फोटो प्रसिद्ध केला आहे. चंद्रयान ३ लँडर चित्राच्या मध्यभागी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एक तेजस्वी प्रभामंडल तयार : नासाने घेतलेल्या प्रतिमेला जोडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रॉकेट उतरण्याच्या प्रक्रियेत उडालेली तिथली माती यामुळे चंद्रयान 2 भोवती एक तेजस्वी प्रभामंडल तयार झालं आहे असं दिसतं. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरले तेव्हा भारताने एक मोठी झेप घेतली. यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो पहिला देश ठरला आहे. चार वर्षांपूर्वी चंद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगमुळे भारताला अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.

भारत हा चौथा देश ठरला :अमेरिका, चीन आणि रशियानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर वेगवेगळी कामं केली. ज्यामध्ये सल्फर आणि इतर किरकोळ घटकांची उपस्थिती शोधणं, सापेक्ष तापमान रेकॉर्ड करणं आणि त्याच्या सभोवतालच्या घटनांची टिपणे घेणं समाविष्ट होतं. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 'स्लीप मोड'मध्ये आहेत. 22 सप्टेंबर 2023 च्या सुमारास ते जागे होण्याची अपेक्षा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं चंद्रयान 3 विक्रम लँडरची त्रिमितीय 'अ‍ॅनाग्लिफ' प्रतिमा जारी केली आहे.

हेही वाचा :

  1. Aditya L1 mission : आदित्य एल1 उपग्रहाची काय आहे स्थिती? इस्रोनं दिली महत्त्वाची माहिती
  2. Aditya L1 mission : आदित्य एल1 उपग्रहाची काय आहे स्थिती? इस्रोनं दिली महत्त्वाची माहिती
  3. Chandrayaan 3 update : विक्रमने पुन्हा चंद्रावर मारली 40 सेमी उंच उडी; केलं सॉफ्ट लँडिंग - इस्रो

ABOUT THE AUTHOR

...view details