महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

रॉयल एन्फील्डने परत मागविले 'ही' २.३६ लाख वाहने; इग्निशन कॉईल आढळले सदोष

रॉयल एन्फील्डच्या माहितीनुसार सदोष इग्नीशन कॉईलमुळे मिसफायरिंग होऊ शकते. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता कमी होते. अपवादात्मक स्थितीत मोटारसायकलमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ शकते.

Royal Enfield
रॉयल एन्फील्ड

By

Published : May 19, 2021, 7:09 PM IST

नवी दिल्ली - दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एन्फील्डने स्वच्छेने २,३६,९६६ मोटरसायकल परत मागविण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये क्लासिक, बुलेट, मेटेटॉर या मॉडेलचा समावेश आहे. इग्निशन कॉईलमध्ये त्रुटी आढळल्याने कंपनीने ही वाहने परत मागवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉयल एन्फील्डच्या माहितीनुसार सदोष इग्नीशन कॉईलमुळे मिसफायरिंग होऊ शकते. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता कमी होते. अपवादात्मक स्थितीत मोटारसायकलमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ शकते. कंपनीने नेहमीप्रमाणे अंतर्गत दुचाकींचे टेस्टिंग केले. तेव्हा निवडक बॅचमधील मोटरसायकलीच्या इग्निशन कॉईलमध्ये त्रुटी असल्याचे आढळले आहे. इग्निशन कॉईलसाठी लागणारे मटेरियल हे बाह्य पुरवठादाराकडून डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आले होते.

हेही वाचा-टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना मिळाले २०.३६ कोटी वार्षिक वेतन !

पूर्वकाळजी म्हणून उपाययोजना-

रॉयल एन्फील्डच्या माहितीनुसार ही त्रुटी अपवादात्मक आहे. त्याचा उत्पादन केलेल्या मोटरसायकलींवर परिणाम होणार नाही. सुरक्षिततेसाठी नियमनाचे पालन आणि पूर्वकाळजी म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे रॉयल एन्फिल्डने म्हटले आहे. कंपनीने निवडक मॉडेल आणि ठराविक काळात उत्पादित झालेले मॉडेल परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-होंडापाठोपाठ बजाज ऑटोकडून मोफत सेवेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

या मोटरसायकलींची होणार दुरुस्ती

  • मेटेटॉर मोटरसायकल जर डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये विक्री अथवा उत्पादन असेल तर हे परत घेण्यात येणार आहेत. तर क्लासिक आणि बुलेटची जर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत उत्पादन आणि विक्री असेल तर ही मॉडेल परत घेण्यात येणार आहेत.
  • या मॉडेलची तपासणी करून आवश्यकता असेल तर सदोष असलेला भाग बदलून देण्यात येणार आहे.
  • कंपनीच्या अंदाजानुसार १० टक्के दुचाकींसाठी पार्ट बदलून द्यावे लागणार आहेत. मेटेटॉर, क्लासिक, बुलेट मोटरसायकलमधील दुरुस्तीसाठी कंपनीने भारत, थायलंड, इंडोनिशिया, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मलेशियातील ग्राहकांना सूचना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details