हैदराबाद -ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक कार हे उद्याचे भविष्य मानले जात होते. मात्र, ऑटोमोबाईल क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट होण्याची चिन्हे आहेत. कारण, इलेक्ट्रिक कारची गोष्ट सोडा, आता चर्चा आहे, उडणाऱ्या कारेची!
एअरकार या हायब्रीड विमानाचे दोन विमानतळादरम्यान आज पहिले यशस्वी उड्डाण झाले आहे. एअरकारचे डिझाइनर स्टीफन क्लेन म्हणाले, की स्लोवाकियामध्ये नायट्रा आणि ब्रातिस्लावा या दोन शहरांमधील अंतर हायब्रीड विमानाने ३५ मिनिटांमध्ये पूर्ण केले.
हेही वाचा-Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला
कारसारखी रचना असलेले हायब्रीड विमानाने उड्डाण घेणे सोपे नव्हते. हे हायब्रीड विमान किंवा एअरकार रस्त्यावरही चालू शकते. हे तयार करण्यासाठी तंत्रज्ञांनी खूप परिश्रम घेतले आहे. या उडत्या कारमध्ये लावण्यात आलेली मोटर पंख्यांना बाहेर काढते. त्यानंतर ही कार उडण्यासाठी तयार होते. या प्रक्रियेला केवळ १५ मिनिटांचा अवधी लागतो. तसेच तेवढाच वेळ हा पंखे बंद करण्यासाठी लागतो.