नवी दिल्ली : कोविडमुळे कर्करोगाच्या तपासणी आणि उपचारांवर परिणाम झाला होता. परंतु, महामारीनंतर स्क्रीनिंग सेवा ( Treatment Affected Due to Covid ) वाढल्या ( Cancer Treatment Affected Due to Covid ) आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ( Union Minister of State for Health Bharti Pawar ) पवार ( Health and Wellness Centres ) यांनी शुक्रवारी ( Oral Cancer ) लोकसभेत दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सरकार स्क्रीनिंग वाढविण्यावर आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्यावर भर देत आहे.
हेल्थ अँड वेलनेस सेंटरद्वारे कर्करोगाची तपासणीत एकूण प्रकरणे :"कोविडमुळे, कर्करोगाच्या तपासणी आणि उपचारांवर परिणाम झाला. कोविडनंतर, तपासणी वाढवली आहे." असे पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, देशभरात 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर (HWC) द्वारे कॅन्सर तपासणी सेवा पुरवल्या जात आहेत. या HWCs द्वारे, तोंडाच्या कर्करोगाची 16 कोटी प्रकरणे, स्तनाच्या कर्करोगाची आठ कोटी प्रकरणे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुमारे 5.53 कोटी प्रकरणे आढळून आली आहेत, असे मंत्री म्हणाले.