महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

सिंधुदुर्गात येणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाची होणार अँटीजेन रॅपिड टेस्ट - Sindhudurg corona news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाची सध्या अँन्टीजन रॅपिड टेस्ट केली जात आहे. कोविड सेंटरवर तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांचीही टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Sindhudurg
Sindhudurg

By

Published : Apr 19, 2021, 6:56 PM IST

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाची सध्या रॅपिड अँन्टीजन टेस्ट केली जात आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. कोविड सेंटरवर तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांचीही टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर रॅपिड अँटिजन टेस्ट-

जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण चेकनाक्यावरून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट होत नसेल, तेथे प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्याचेही निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील कोविड सेंटर तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात नातेवाइकांची गर्दी होत आहे. यात कोरोना संसर्गाची शक्यता अधिक प्रमाणात राहते. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटरवर येणाऱ्या नातेवाइकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे. मात्र ही कृती रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास देण्यासाठी नाही. तर कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी आहे. जास्तीत जास्त कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी टेस्ट केली जात आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना मृतांवर होणार गावातच अंत्यसंस्कार-

ग्रामीण व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शहरात आणला जातो. मात्र त्या मृतदेहावर गावातच अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देश सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा मृतदेह गावी नेण्यासाठी दोन शववाहिन्या लवकरच उपलब्ध करून देत असल्याचीही ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details