महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

सीमा सुरक्षा बल स्थापना दिवस 2023; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या 'सुरक्षा बला'ची कहानी

BSF Foundation Day 2023 : सीमा सुरक्षा बल म्हणजेच बीएसएफमुळं प्रत्येक भारतीय शांतपणे झोपतो. सीमा सुरक्षा बलाचे जवान कठीण हवामानातही देशाच्या सीमांना अभेद्य भिंतीप्रमाणं सुरक्षित ठेवतात. बीएसएफ ही आपल्या देशाच्या संरक्षणाची सर्वात मोठी ताकद आहे.

BSF Foundation Day 2023
सीमा सुरक्षा बल स्थापना दिवस 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 1:59 PM IST

Updated : Dec 1, 2023, 9:00 AM IST

हैदराबाद : सीमा सुरक्षा बल म्हणजेच बीएसएफची स्थापना 01 डिसेंबर 1965 रोजी झाली. सीमा सुरक्षा बलाला सीमेवर अनेक वेळा दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ल्यांना यशस्वीपणं सामोरे जाण्यात यश आलं आहे. 59 व्या वर्षी सीमा सुरक्षा बल जगातील सर्वात मोठं फ्रंटलाइन फोर्स बनलं आहे. या संदर्भात काही माहिती आणि काही आश्चर्यकारक तथ्यं जाणून घ्या.

बीएसएफ स्थापना दिनाचा इतिहास : 09 एप्रिल 1965 रोजी पाकिस्ताननं भारतातील कच्छमधील सरदार पोस्ट, बेरिया बेट आणि छार बेटावर अचानक हल्ला केला. पाकिस्तानच्या या विश्वासघात आणि अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या बलाला पाकिस्तानी लष्कराशी लढण्यासाठी सशस्त्र प्रशिक्षण दिलं जाईल, अशी योजना होती. भारताच्या सुरक्षा सचिवांच्या समितीच्या शिफारशीनंतर, सीमा सुरक्षा बलाची स्थापना 01 डिसेंबर 1965 रोजी 25 बटालियनसह करण्यात आली. या अत्यंत प्रतिष्ठित लष्करी बलाचे पहिले संस्थापक खुसरो फिरोज रुस्तम होते.

बीएसएफ स्थापना दिनाचं महत्त्व :पाकिस्तानी आक्रमण हाणून पाडण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या सीमा सुरक्षा बलानं कालांतरानं अनेक यशस्वी कारनामे केले. उदाहरणार्थ, 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, बीएसएफ भारताच्या सुरक्षेत अभेद्य भिंत बनली आणि बीएसफच्या जवानांनी पाकिस्तानचा नापाक हेतू हाणून पाडला. पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यात बऱ्याच अंशी यश आलं. बीएसएफ दरवर्षी संयुक्त राष्ट्र मिशनच्या सेवेसाठी आपले जवान पाठवून विशेष योगदान देते. गुजरातमधील जातीय दंगलींमध्ये परस्पर बंधुभाव आणि सलोखा राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या दोन वर्षांपासून बीएसएफचे जवान मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी लढत आहेत. बीएसएफच्या देखरेखीखाली जम्मू-काश्मीरच्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम पूर्ण झालं. या कुंपणामुळे दहशतवाद्यांची घुसखोरी बऱ्याच अंशी थांबली आहे.

बीएसएफ ही जगातील सर्वात मोठी फौज आहे :1965 मध्ये 25 बटालियनसह सुरू झालेल्या बीएसएफच्या आज सुमारे 192 बटालियन आणि 2.57 लाख सशस्त्र सैनिकांसह जगातील सर्वात मोठं सीमा सुरक्षा बल बनलं आहे. BSF ही केंद्र नियंत्रित सरकारी संस्था आहे, जी गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. BSF हे एकमेव केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे, ज्याचं स्वतःचं एअर टीयर स्मोक युनिट (TSU) दंगलविरोधी बलांसाठी अश्रुवायू शस्त्रं तयार करते. ते या सुविधा इतर देशांमध्ये निर्यात करतात. BSF कडं उंट आणि श्वानांचा स्वतंत्र विभाग देखील आहे, जो कच्छच्या वाळवंट आणि भारत-पाकिस्तान सीमेसारख्या दुर्गम भागात कार्य करण्यास सक्षम आहे. आज बीएसएफकडं सक्रिय महिला जवानांची एक तुकडी देखील आहे. महिलांची ही तुकडी पुरुषांच्या बरोबरीनं सेवा बजावण्यास सक्षम आहे.

हेही वाचा :

  1. पुढील आठवड्यापासून 'ही' लाखो गुगल अकाऊंट हटवली जातील, गुगलनं दिला इशारा
  2. जे आर डी टाटा यांची पुण्यतिथी; देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिली नवी भरारी
  3. पासवर्डमध्ये इमोजी वापरता येतात की नाही? घ्या जाणून
Last Updated : Dec 1, 2023, 9:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details