महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Apple Watch Saves Life : अॅप्पल वॉचने वाचवला एकाचा जीव, घातक अंतर्गत रक्तस्त्रावाबाबत दिले नोटीफिकेशन - अॅप्पल वॉच

अॅप्पल वॉचने एका तरुणाचा जीव वाचवल्याची घटना सॅन फ्रान्सिस्को येथे घडली आहे. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे या तरुणाला अॅप्पल वॉचने वारंवार नोटीफिकेशन पाठवल्या. त्यामुळे तरुणाने आपल्या डॉक्टरला संपर्क करत याबाबतची माहिती दिली. डॉक्टरने त्या तरुणाचे पल्स रेट चेक करुन त्याला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवून दिली.

Apple Watch Saves Man
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 20, 2023, 7:56 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : अॅप्पल वॉचने अनेकांना जीवदान दिल्याची घटना अनेकदा उघडकीस आली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे अॅप्पल वॉचने आणखी एकाचा जीव वाचवल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. डुलकी घेतल्यानंतर रेसींग पल्सबाबत माहिती देऊन अॅप्पल वॉचने अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याचे टिपले होते. त्यामुळे अॅप्पल वॉचने याबाबत अलर्ट केल्यामुळे व्यक्तीचा जीव वाचवल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची पोस्ट या व्यक्तीने सोशल माध्यमात शेअर केली आहे.

पल्स रेटबद्दल अॅप्पल वॉचने दिला इशारा :याबाबत डिजिटल मोफो या युजरने याबाबत सोशल माध्यमात पोस्ट शेअर करत माहिती दिली. यावेळी त्याने मी माझा आय फोन डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवला होता. मात्र कामामुळे थकल्याने आपल्याला डुलकी लागल्यानंतर अॅप्पल वॉचने पल्स रेटबाबत १० नोटीफिकेशन्स दिल्या. त्यामुळे मी गोंधळून गेलो. डुलकी घेत असल्यामुळे असे झाले असण्याची शक्यता मी गृहीत धरली. मात्र पुन्हा पुन्हा नोटीफिकेशन्स येत होत्या. त्यामुळे मी कुशी बदलून झोपून पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र तरीही वारंवार नोटीफिकेशन्स येत राहिल्याचे त्यांने सांगितले. त्यामुळे मी गोंधळून गेलो असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

डॉक्टरला केला फोन :अॅप्पल वॉच वारंवार नोटीफिकेशन्स देत असल्याने डिजिडल मोफो या युजरने आपल्या डॉक्टरला फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यावेळी डॉक्टरने तात्काळ माझा प्लस रेट चेक केला. त्यानंतर माझा ऑक्सिजन चेक करुन ९११ या क्रमांकावर त्याच्यासाठी कॉल केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याचे त्याने नमूद केले.

अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने धोका : अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे अॅप्पल वॉचने वारंवार नोटीफिकेशन्स केल्याचे डिजिटल मोफो या यूजरने यावेळी सांगितले. त्यामुळे त्याला हृदयरोगाचा झटका होण्याची शक्यता होती. मात्र ही जीआय रक्तस्त्राव होता. त्यामुळे वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाली नसती, तर माझ्या जीवाला धोका झाला असता, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र अॅप्पल वॉचने वेळीस अलर्ट केल्यामुळे त्याला वैद्यकीय सुविधा मिळाल्याचेही त्याने यावेळी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.

यापूर्वीही अॅप्पलने वॉचने वाचवला अनेकांचा जीव :एलेन थॉम्पसनला तिच्या अॅप्पल वॉचने वाचवल्याची घटना नुकतीच घडली आहे. एलेन थॉम्पसनला तिच्या अॅप्पल वॉचने तिच्या हृदयाचे ठोके नियमीत नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एलन हृदयरोग तज्ज्ञांकडे गेली. यावेळी हृदयरोग तज्ज्ञांनी तिची तपासणी करुन आठवडाभर तिला हार्ट मॉनिटर बसवला. त्यानंतर एलन झोपली असताना तिचे हृदय 19 सेकंदांसाठी थांबल्याची माहिती मॉनिटर्सने रुग्णालयाला दिली. डॉक्टरांनी थॉम्पसनला हार्ट ब्लॉकेज असल्याचे निदान केले. त्यामुळे एलनला त्या स्थितीत मदत करण्यासाठी पेसमेकरचे रोपण करण्यात आले. एलनने अॅप्पल वॉचने माझा जीव वाचल्याचे सांगितले. जर मला अॅप्पल वॉचकडून इशारा मिळाला नसता, तर मी डॉक्टरांकडे गेली नसते, असेही एलन म्हणाली. आता मी नेहमी अॅपल वॉच घालत असल्याची एलन म्हणाली. माझा मृत्यू होऊ शकतो हे जाणून घेणे माझ्यासाठी खूप भीतीदायक होते. माझ्या हृदयाचे ठोके 19 सेकंदांसाठी थांबले होते. त्यामुळे मी कदाचित जागे झाले नसते असेही एलन म्हणाली.

हेही वाचा - Paid Verification For FB And Insta : इंस्टाग्राम, फेसबुक व्हेरिफिकेशनला आता मोजा पैसे, मार्क झुकेरबर्गच्या घोषणेवर एलन मस्कची 'ही' प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details