सॅन फ्रान्सिस्को : Apple ने 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा 'परवडणारा' iPhone SE लॉन्च केला आहे. iPhone SE 64GB, 128GB, आणि 256GB मॉडेलमध्ये मिडनाईट, स्टारलाईट आणि रेड यात उपलब्ध असून 43900 रुपयांपासून सुरू होईल. " आयफोन एसई हा डिझाइन, उत्तम प्रदर्शन आणि परवडणारी किंमत यामुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे, असे अॅपलचे वर्ल्डवाइड आयफोन प्रॉडक्ट मार्केटिंगचे उपाध्यक्ष Kaiann Drance यांनी सांगितले.
यात 750x1,334 पिक्सेल रिझोल्यूशनसह 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले आहे. जो 326ppi पिक्सेल घनता आणतो आणि 625 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणतो. नवीन iPhone मागील iPhone SE प्रमाणेच - f/1.8 वाइड अँगल लेन्ससह 12MP कॅमेरा सेन्सर्संसह येतो. iPhone SE (2022) डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 4 आणि फोटोग्राफिक शैली ही याची वैशिष्टये आहेत. 60fps पर्यंत 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगही करता येते.