नवी दिल्ली :अवकाशातील फोटोमधून आता अस्पष्ट भाग काढून टाकता येणारे टूल एआयने विकसित केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे दुर्बिणीने आकाशातील फोटो अगदी स्पष्ट येणार असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. एआयने विकसित केलेले हे टूल वास्तव फोटो तयार करत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ आणि चीनमधील सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
भौतिकशास्त्रज्ञांना फायदेशीर टूल : विज्ञानासाठी खगोलशास्त्रीय फोटोचा वापर केला जातो. योग्य प्रकारे फोटो साफ करून आम्ही अधिक अचूक डेटा मिळवू शकत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे टूल अल्गोरिदम संगणकाच्या मदतीने वातावरणातील अस्पष्टता काढून टाकते. त्यामुळे हे संशोधन भौतिकशास्त्रज्ञांना अधिक चांगले वैज्ञानिक मोजमाप करण्यास उपयोगी ठरत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन जर्नल मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाले आहे.
आकाशगंगेचा दिसणार स्पष्ट आकार :सूर्य मावळतीला गेल्यानंतर आकाशातील फोटो स्पष्ट येते नाहीत. त्यामुळे खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना दुर्बिनीतून फोटो घेतल्यानंतर तो ब्लर येतो. मात्र या संशोधकांनी विकसित केलेल्या टूलमधून सायंकाळचे फोटोदेखील अगदी स्पष्ट येत असल्याचा दावा या संशोधनाच्या संशोधक इम्मा अलेक्झांडर यांनी केला आहे. पृथ्वीच्या वातावरणामुळे निर्माण होणारी अस्पष्टता या टूलमुळे काढता येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खगोलशास्त्रज्ञ जगाचा डेटा काढण्यासाठी प्रतिमांचे विश्लेषण करतात, त्यावेळी मोठी अडचण येते. मात्र या टूलमुळे ही अडचण दूर होणार आहे. आकाशगंगांच्या स्पष्ट आकारांचा अभ्यास करण्यासाठी या टूलचा फायदा होणार आहे. खगोलशास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात कॉस्मॉलॉजिकल स्ट्रक्चर्सचे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव शोधण्यातही या टूलची मदत होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वातावरणातील अस्पष्टता फोटो स्मीअर करुन या टूलमुळे आकाशगंगांचा आकार स्पष्टपणे दिसते. त्यामुळे वैज्ञानिकांना अचूक आकाराचा डेटा गोळा करण्यास हे टूल मदत करते, असेही इम्मा अलेक्झांडर यांनी स्पष्ट केले आहे.
अवकाश सर्वेक्षणांसाठी मौल्यवान टूल :जमिनीवरील दुर्बिणीतून एखादा फोटो पाहिल्यास त्याचा आकार वेगळा होऊ शकतो. मात्र हे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे व वातावरणामुळे हे जाणून घेणे कठीण असल्याचे अलेक्झांडर यांनी स्पष्ट केले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी संशोधकांनी खगोलशास्त्रीय फोटोवर प्रशिक्षित शिक्षण नेटवर्कसह ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम एकत्र केले. यामध्ये वेरा सी. रुबिन वेधशाळेच्या अपेक्षित इमेजिंग पॅरामीटर्सशी जुळणारा सिम्युलेटेड डेटा समाविष्ट आहे. त्यामुळे फोटोतून टूलने अस्पष्टता काढून टाकण्याच्या क्लासिक पद्धतींच्या तुलनेत 38.6 टक्के कमी त्रुटी दिसून आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. आधुनिक पद्धतींच्या तुलनेत 7.4 टक्के कमी त्रुटी असलेले फोटो या टूलने तयार केल्याचा दावाही अलेक्झांडर यांनी केला आहे. आता आम्ही हे टूल खगोलशास्त्र तज्ञांच्या हाती देऊन शक्य तितका वास्तववादी डेटा मिळवण्यासाठी हे एक मौल्यवान संसाधन असू शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Engineered Kidney : संशोधकांनी तयार केली कृत्रिम किडनी; औषधांच्या विषारीपणाचा लावणार लवकर शोध