महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते-अहवाल

कृषी क्षेत्र हे कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेची क्षमता वापरू शकते, असे मत नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनी मत व्यक्त केले. नेदरलँड हे कृषी क्षेत्रातील प्रभावी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करणारे चांगले उदाहरण आहे. कमी जमीन असूनही नेदरलँड हा कृषी मालाच्या निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

AI use in agriculture
कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता

By

Published : Mar 27, 2021, 7:42 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून मिळणारी मदत वाढत असल्याने कृषीतंत्रज्ञान पुरवठादारांचे प्रमाण वाढत आहे. तसेच स्टार्ट-अप इकोसिस्टिम आणि कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा (एआय) ग्रामीण भागात शेतीमध्ये वापर वाढला आहे. मोठ्या परिवर्तनाला प्रेरणा मिळत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. 'भारतात जास्तीत जास्त कृषी उत्पादन वाढविण्यासाठी एआयचा वापर' असे या अहवालाचे शीर्षक आहे.

डाटा एकत्रित करताना डाटावरील प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या त्रुटीबाबत जागृती कमी आहे. त्याची उपलब्धता ही काही क्षेत्रांसाठी आज आव्हानात्मक आहे. कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या बियांची गुणवत्ता, पुरेशा यांत्रिकीकरणाचा अभाव, जलसिंचनाच्या पायाभूत सुविधांचा अभाव, शेतकऱ्यांकडे पुरसे भांडवल नसणे, सतत पिकांवर रोग पडणे, पुरेशा साठवण क्षमतेचा अभाव ही कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळीतील प्रमुख आव्हाने आहेत.

हेही वाचा-आरबीआयकडून पीएमसी बँकेवरील निर्बंधात ३0 जूनपर्यंत वाढ

कृषी क्षेत्र हे कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेची क्षमता वापरू शकते, असे मत नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनी मत व्यक्त केले. नेदरलँड हे कृषी क्षेत्रातील प्रभावी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करणारे चांगले उदाहरण आहे. कमी जमीन असूनही नेदरलँड हा कृषी मालाच्या निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सच्या चाचणीची भारतात सुरुवात; सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता

कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचे हे होऊ शकतात फायदे

कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर समजण्यासाठी केंद्र सरकार आणि उद्योग यांनी संयुक्तपणे पायाभूत सुविधांची गरज समजणे आवश्यक आहे. तसेच धोरणांची मदत आणि स्टार्टअपला आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे देबजानी घोष यांनी म्हटले आहे. कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर केल्यास कृषी क्षेत्राचे व्यवस्थापन, कृषी रोबोट, पिकांची गुणवत्ता , कीटकांपासून बचाव आदीमध्ये वापर करता येणे शक्य असल्याचे घोष यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details