महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

What3words App: हे गुगल मॅपला पर्यायी अ‍ॅप आहे; जाणून घ्या कसे वापरावे - ख्रिस शेल्ड्रिक

what3words (What3Words app) व्हॉट थ्री वर्ड्स अ‍ॅप तीन शब्द कोडवर काम करते. हे तुम्हाला अ‍ॅपद्वारे जनरेट केलेल्या तीन कोडमधून स्थानाची माहिती देते. जी तुम्ही सेव्ह करू शकता आणि नंतर तेथे पोहोचण्यासाठी किंवा एखाद्याला बोलवण्यासाठी त्याचा वापर करू शकता.येथे अ‍ॅप तुम्हाला सांगते की जगात दर तीन मीटरवर एक शब्द पत्ता आहे. म्हणजेच, तुमच्या सभोवतालच्या 3 मीटर अंतरावरील प्रत्येक स्थानावर एक कोड आहे जो तीन शब्दांमध्ये विभागलेला आहे. मग तुम्हाला तिथे पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

what3words
what3words

By

Published : Jan 17, 2022, 4:26 PM IST

हैदराबाद : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना प्रत्येक गोष्ट लगेच आणि हाताशी हवी असते. यासाठी लोक गुगल मॅपचीही मदत घेतात. त्याचबरोबर कुठेही प्रवास करायचा असेल आणि रस्ता माहीत नसेल तर आपण गुगल मॅपची मदत घेतो. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना रस्ता विचारत असत, त्याच वेळी, आजकाल आपण शोध बारमध्ये फक्त स्थान प्रविष्ट करतो आणि आपल्या हव्या त्या ठिकाणी पोहोचतो. पण तुम्हाला व्हॉट थ्री वर्ड्स अ‍ॅप (what3words) अ‍ॅपबद्दल माहिती आहे का?

what3words अ‍ॅप हे असेच एक अ‍ॅप आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपण जगाला त्याचे ठिकाण आणि नावाने ओळखतो, परंतु या अ‍ॅपमध्ये सर्व काही स्क्वेअर आणि ग्रिडच्या मदतीने केले जाते. म्हणजेच, तुमच्या सभोवतालच्या 3 मीटर अंतरावरील प्रत्येक स्थानावर एक कोड आहे जो तीन शब्दांमध्ये विभागलेला आहे. म्हणजेच इंडिया गेटचे सांकेतिक नाव thrillers.widgets.income आहे.

नेमक्या त्याच ठिकाणी पोहोचू शकतो-

अशा परिस्थितीत आता अ‍ॅपमधील या तीन शब्दांच्या कोडच्या मदतीने तुम्ही नेमक्या त्याच ठिकाणी पोहोचू शकता. पण जर तुम्ही ताजमहालच्या शेजारी उभे असाल आणि तुमच्या मित्राला सांगू इच्छित असाल की मी ताजमहालपासून 200 मीटर दूर आहे. तर तुम्ही सर्च बारवर जाऊन तुमचे लोकेशन सेट करू शकता. यानंतर तुम्हाला तीन शब्दांचा एक वेगळा कोड मिळेल जो moats.flinches.upwardly असा असेल. तुम्ही हे तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता. आणि मग तुमचा मित्र ताजमहालपासून अगदी 200 दूर तुमच्यापर्यंत पोहोचेल.

पण, जर तुम्ही गूगल मैप्स (Google Maps) वरून हे शोधले तर ते अचूक स्थान घेणार नाही आणि फक्त ताजमहाल दर्शवेल. अशा परिस्थितीत, तुमचा मित्र तुम्हाला शोधत राहील आणि त्याला योग्य स्थान मिळणार नाही. म्हणूनच हे अ‍ॅप खूप फायदेशीर आहे.

what3words कसे काम करते?

what3words (What3Words app) तीन शब्दांच्या कोडवर कार्य करते आणि अ‍ॅपद्वारे जनरेट केलेल्या तीन कोडमधून तुम्हाला स्थानाची माहिती देते जी तुम्ही स्क्वेअर म्हणून सेव्ह करू शकता आणि नंतर तिथे पोहोचण्यासाठी किंवा एखाद्याला बोलवण्कयासाठी करू शकता. येथे अ‍ॅप तुम्हाला सांगतो की जगात दर तीन मीटरवर एक शब्द पत्ता आहे. म्हणजेच तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि त्यात ग्लोबल पोजिशन सिस्टेम (Global Positioning System)असेल तर तुम्ही what3words अ‍ॅप वापरू शकता. whats3words अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कुठेही पोहोचू शकता, त्यामुळे कोणीही तुमच्यापर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचू शकेल.ख्रिस शेल्ड्रिकचे (Chris Sheldrick) या अ‍ॅपमागे डोके आहे. चुकीच्या लोकेशनमुळे नाराज झाल्यावर क्रिसला ही कल्पना सुचली. म्हणजेच, तुम्ही गावात राहत असाल आणि तिथल्या कोणत्याही ठिकाणाचे नाव नसेल तर कोणताही माल तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु जर तुम्ही 3 शब्दांचा कोड कोणाशीही शेअर केलात, तर ती व्यक्ती त्रास न होता तुमच्यापर्यंत कोणत्याही नावा शिवाय पोहोचेल.

अडचणीच्यावेळी प्रभावी ठरत आहे-

या अ‍ॅपचे (What3Words अ‍ॅप) इमर्जन्सी सेवेद्वारे गेम चेंजिंग असे वर्णन केले आहे. कारण तुम्ही 999 डायल केल्यास तुम्हाला तुमचे लोकेशन विचारले जाते, त्यानंतर तुम्ही टेक्स्ट मेसेजच्या मदतीने तुमच्या योग्य लोकेशन कोडद्वारे त्यांना थेट पाठवू शकता आणि त्यानंतर कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच तुमचा अपघात झाला किंवा तुम्ही कुठेतरी अडकलात, तर हे अ‍ॅप तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.

वाद चालू आहे-

आता अ‍ॅपबाबत अनेक वाद सुरू आहेत. यूकेमधील अनेक आपत्कालीन सेवा हे अ‍ॅप वापरतात. अशा स्थितीत मदत करताना अ‍ॅपमधील अनेक तीन शब्दांचे कोड एकाच प्रकारचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. म्हणजेच, जर त्यांना X स्थानापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यांच्याकडे X शी संबंधित समान अनेक स्थान दिसत आहेत. ज्यामुळे ते योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि लोकांना मदत करता येत नाही. यावर कंपनीचे प्रमुख ख्रिस शेल्ड्रिक म्हणाले की, आजूबाजूचे शब्द सारखे असू शकतात, ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो, परंतु हे फार क्वचितच घडते. यापूर्वी W3W (What3Words अ‍ॅप ) ने एका सुरक्षा संशोधकावर आरोप केला आहे की, त्याने कंपनीचा ओपन सोर्स प्रोजेक्ट दुसऱ्या संशोधकाशी शेअर केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीने त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. संशोधकाने सांगितले की, अ‍ॅप किती अचूक आहे हे तपासण्यासाठी त्याने ते शेअर केले. लोक त्याचा भरपूर वापर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details