नवी दिल्ली : भारतातील गेमिंग शौकिनांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. लोकप्रिय टेक कंपनी सोनीचे बहुचर्चित उत्पादन प्लेस्टेशन 5, आजपासून प्री-ऑर्डरसाठी ( sony ps 5 pre order ) जाण्यास तयार आहे. हे गेमिंग कंसोल प्री-बुकिंगसाठी दुपारी बारा पासून सर्व ऑनलाइन स्टोर्सवर उपलब्ध असणार आहे. जसे की, शॉपएटएससी (shopatsc), ऍमेझॉन (Amazon) आणि गेम्स दि स्टॉप ( Games the stop ) वर उपलब्ध होईल.
ग्राहक दोन उपलब्ध व्हेरियंट बुक करू शकतात - PS5 स्टँडर्ड डिस्क एडिशन ( PS5 Standsard Disc Edition ) 49,990 रुपये आणि PS5 डिजिटल एडिशन ( PS 5 Digital Edition ) रुपये 39,990 मध्ये. 2022 मधील ही दुसरी PS5 प्री-बुकिंग आहे. रिपोर्ट्सनुसार, चिप्सच्या कमतरतेमुळे सोनी प्लेस्टेशन 5 चा स्टॉक खूप मर्यादित असेल.