नवी दिल्ली : गूगलने सोमवारी प्ले स्टोर मध्ये पास सेक्शन सुरु करण्याची घोषणा ( Announcement to start pass section ) केली आहे. ज्यामध्ये 1,000 हून अधिक अॅप्स आणि गेम जाहिरातीशिवाय ऑफर केले जातील, आणि त्यांना त्यांच्या प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये निश्चित मासिक किंवा वार्षिक शुल्कासाठी प्रवेश दिला जाईल.
ETV Bharat / science-and-technology
Google Play Store : गूगलने भारतात प्ले पास सुरु केले, जाहिरातीशिवाय 1,000 हून अधिक अॅप्स केले ऑफर - Google Play Store
भारताता गूगल प्ले स्टोरमध्ये प्ले पास सेक्शन ( play pass section ) सुरु केला जाईल. प्ले पास फिचरला या आठवड्याच्या दरम्यान संपूर्ण देशात जारी केले जाईल.
प्ले पास कलेक्शनमध्ये ( Play Pass Collection ) जंगल अॅडव्हेंचर्स, वर्ल्ड क्रिकेट बॅटल यासारखे गेम, कोडी किंवा अॅक्शन गेम समाविष्ट असतील. याद्वारे यूजर युनिट कन्व्हर्टर, ऑडिओलॅब आणि फोटो स्टुडिओ प्रो ( Photo Studio Pro ) सारखे अॅप्स देखील ऑफर करेल. प्ले पास ( Play Pass ) भारतातील अनेक अॅप्ससह 59 देशांमधील 41 श्रेणींमध्ये 1,000 उच्च दर्जाचे आणि क्युरेटेड कलेक्शन ऑफर करेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
गूगल प्लेच्या अनुसार वापरकर्ते एक महिन्याच्या चाचणीसह प्रारंभ करू शकतात आणि प्रति महिना 99 रुपये किंवा वार्षिक 889 रुपये सदस्यता घेऊ शकतात. वापरकर्ते 109 रुपयांमध्ये एक महिन्याचे प्रीपेड सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात.