हैदराबाद : जगभरातील लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी 5G तंत्रज्ञान सज्ज झाले आहे. असे दूरसंचार तज्ञ कल्याणी बोगीनेनी (Telecommunications expert Kalyani Bogineni) सांगतात. त्या पुढे म्हणतात की,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा एनालिटिक्स या सारख्या टेक्निकल नवीन कल्पनामुळे संपूर्ण जग मानवाच्या एका बोटावर वसलेले असणार आहे. जे शिक्षण, आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रात खुप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर 5G हायस्पीड इंटरनेट आणि इतर नागरी सुविधा सर्वांसाठी सुलभ होणाार आहेत. तसेच ज्या दुर्गम भागात नेटवर्क कनेक्टीव्हीटीची समस्या आहे, अशा ठिकाणी वायरलेस ब्लॅक-होल तंत्रज्ञानाद्वारे अखंडीत ऑनलाईन शिक्षण देता येईल.
गेल्या तीस वर्षापासून अमेरिकन संशोधन कार्यात कल्याणी बोगीनेनी कार्यरत आहेत. तसेच त्या सध्या Verizon Communications शी संबंधित काम करत आहेत. त्याचबरोबर 5G तंत्रज्ञानाच्या विकासात आपले योगदान देऊन आपली भूमिका चांगल्या पध्दतीने पार पा़डत आहेत. त्या मूळच्या विजयवाडा येथील आहेत. कल्याणी यांनी 1977 मध्ये SVU अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) बेंगळुरूमधून पदवी घेतल्यानंतर, तिने न्यूयॉर्कमधील बफेलो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्याने आतापर्यंत 70 पेटंट मिळवले आहेत आणि त्यांच्या नावावर 35 प्रकाशने आहेत. त्यांचे वडील खरगपूर आयआयटी येथे प्राध्यापक असल्याने कल्याणी यांच्यामध्ये लहानपणापासून अभियांत्रिकीची आवड निर्माण झाली. त्यांना आता Verizon Master Inventor 2021 हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी ETV Bharat सोबतच्या खास मुलाखतीत त्यांनी 5G च्या भविष्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचा ऑटोमेशन आणि नोकरींच्या संधीवर कशा रितीने परिणाम होईल?
5G तंत्रज्ञान लवकरच चौथ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात करेल. त्यामुळे उद्योगधंद्याची स्थिती सुधारेल. त्याचबरोबर रोबोट अनेक डोमेनमध्ये माणसांची जागा घेतील. ते AI आणि IoT कृषी क्षेत्रात खुप महत्वपूर्ण सिद्ध होतील. या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी हा पाणी आणि कीटकनाशक पद्धतीवर लक्ष ठेवण्यास सक्षम असणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर अगोदर काही ठिकाणी करण्यात आला आहे. रोबोटिक्स आणि सेन्सर्समुळे शेती क्षेत्रात नवीन पायंडा पडेल. तसेच या सर्व घडामोडी आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितील बळ देवून हातबार लावतील.
भारत 5G सेवा कधी आणणार?
5G सेवा आणण्या अगोदर प्रथम 5G स्पेक्ट्रम वाटप करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर डेटा सेंटर्स अपग्रेड करावे लागतील. तसेच मोबाइल फोनवरील चिपसेट आणि अॅप्स 5G साठी सक्षम करायला हवेत. वेगवान नेटवर्क निर्माण करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागणार आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान लॉन्च झाल्यानंतर हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी जवळपास दहा वर्षाचा कालावधी लागू शकतो.