सियोल : दक्षिण कोरियाने २०२८ मध्ये सहाव्या पिढीची नेटवर्क सेवा ६जी नेटवर्क सुरु करण्याची योजना आखत आहे. विज्ञान आणि आयसिटी मंत्रालयाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण कोरिया सरकारच्या आयसीटी मंत्रालयाने सोमवारी याबाबतची माहिती दिली. दक्षिण कोरिया सरकारच्या K-Network 2030 योजनेअंतर्गत (Network 2030 South Korea), जागतिक दर्जाचे 6G तंत्रज्ञानाला सुरक्षित करून, सॉफ्टवेअर-आधारित नेक्स्ट-जनरेशन मोबाईल नेटवर्क्स आणि नेटवर्क डिलिव्हरी ही साखळी मजबूत केल्याने 6G नेटवर्कची व्यावसायिक सेवा दोन वर्ष अगोदर सुरू होईल.
481.7 मिलियन डॉलर येणार खर्च : कोरिया सरकार स्थानिक कंपन्यांना देशात ६ जी तंत्रज्ञान बनवण्यासाठी लागणारे साहित्या आणि उपकरण बनवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. त्यासाठी सरकार ओपन आरएएन किवा रेडिओ एक्सेस नेटवर्क विकसित करणार असल्याची माहिती आयसीटी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून मोबाईल डिवाईससाठी अनुकूल असेल. त्यासह मोबाईल कॅरियर आणि उपकरणाला सक्षम बनवण्यासाठी कार्य करेल, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या सगळ्या योजनेसाठी सरकारला ६२५.३ अरब वॉन अर्थात ४८१.७ मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. याबाबत ६जी प्राद्योगिक आणि अनुसंधानासह विकास योजनांसाठी अभ्यास सुरू असल्याची माहिती आयसीटी मंत्रालयाने दिली आहे.