गंगापूर (छत्रपती संभाजी नगर) Sexually Assaults Case : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये सख्ख्या भावानं बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. असं असतांनाच आता या घटनेत पीडितेच्या नात्यातील सहाय्यक पोलीस फौजदाराचा समावेश असल्याची माहिती समोर आली. भाऊ आणि नात्यातील पोलीस पदावर असलेल्या एकानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानं पीडिता गर्भवती राहिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर भावानंतर आता ५२ वर्षीय नराधमाविरुध्द १३ ऑक्टोबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. आरोपीला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी पीडितेला धीर दिल्यानंतर दुसऱ्या आरोपीचं नाव आलं समोर :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष होनाजी यानं नात्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसतांना सहा महिन्यापूर्वी आणि त्यानंतर वारंवार बलत्कार केला. पीडितेनं सुरुवातीला भावानं अत्याचार केल्याचं सांगितलं. त्यामुळं गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी सुरुवातीला पीडितेच्या भावाविरुध्द गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणात आणखीन एक गुन्हेगार असून, तो पोलीस खात्यात असल्यानं मुलीला त्याचं नाव सांगण्याची हिमंत झाली नाही. मात्र, पाेलिसांना त्या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पीडितेला धीर देत अधिक माहिती घेतली. तेव्हा तिनं नातेवाईक असलेल्या आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक गागुर्डेनंदेखील वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. तसंच पीडितेच्या भावानं जीवे मारण्याची धमकी देत शेतात आणि राहत असलेल्या घरात अत्याचार केला. यामुळं पीडिता दोन महिन्याची गर्भवती राहिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सुरुवातीला तिच्या भावावर नंतर सुभाष गांगुर्डे विरोधात पोक्सो आणि विविध कलमां अंतर्गत १३ ऑक्टाेबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय.