महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / premium

Attempt To Robbery At Gunpoint : ज्वेलरी दुकानात पिस्तुल रोखून लुटमारीचा प्रयत्न - लुटमारीचा प्रयत्न फसला

पिस्तुल दाखवून ज्वेलरी दुकानात (Attempted robbery with pistol in jewelers shop) लूटमार करण्याचा प्रकार (Robbery attempt at pistol point) घडला असून, दुकानातील महिला आणि मालक यांच्या समयसुचकतेमुळे लुटमारीचा प्रकार फसला (robbery attempt foiled) आहे. तर लुटमारीसाठी आलेला अज्ञात इसम आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत.

Attempt To Robbery At Gunpoint
Attempt To Robbery At Gunpoint

By

Published : Oct 22, 2022, 6:03 PM IST

रायगड : शनिवारी सकाळी उरणच्या सिडको विभागात पिस्तुल दाखवून ज्वेलरी दुकानात (Attempted robbery with pistol in jewelers shop) लूटमार करण्याचा प्रकार (Robbery attempt at pistol point) घडला असून, दुकानातील महिला आणि मालक यांच्या समयसुचकतेमुळे लुटमारीचा प्रकार फसला (robbery attempt foiled) आहे. तर लुटमारीसाठी आलेला अज्ञात इसम आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. समय सुचकतेमुळे लुटमारीचा प्रकार टळला. (Raigad Crime) (Latest news from Raigad)


इमर्जन्सी अलार्म दाबून केले अलर्ट -उरण तालुक्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून झपाट्याने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोडमध्ये एका अज्ञात व्यक्तीने पिस्तूलाचा धाक दाखवत लुटमारीचा प्रकार केल्याची घटना घडली आहे. द्रोणागिरी सेक्टर 50 मध्ये एम.गोल्ड नामक ज्वेलरी दुकानामध्ये अज्ञात इसमाने प्रवेश करत दुकानातील महिलेस पिस्तुल दाखवत धमकावण्याची सुरुवात केली असता, दुकानाच्या आतील बाजूस असणाऱ्या दुकान मालकाने समय सुचकता दाखवत इमर्जन्सी अलार्म दाबून सर्वांना जागृत केले.

अलार्म वाजताच लुटारुंचे पलायन -यावेळी दुकानातील महिलेने संबंधित इसमास तीव्र विरोध केला. जोरदार वाजणाऱ्या सायरनचा धसका घेत, तात्काळ पळ काढून बाहेर उभ्या असणाऱ्या सफेद इनोव्हा कारमध्ये बसून लुटारूंनी पलायन केले. यावेळी इनोव्हा कारमध्ये आणखी 2 जण असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान संबंधित इसमाने चेहरा कपड्याने झाकला होता.


गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसात -एकंदरीत सर्व प्रकाराबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकान मालक मिलन आदव यांनी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसात दिले आहे. उरण पोलिसांकडून घटनेचा तपास घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details