हैदराबाद : कोविड-१९च्या प्रादुर्भावास जबाबदार असलेल्या सार्स कोव्ह २ या कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत असताना, व्हायर बायोटेक्नॉलॉजीच्या डेव्हिड कॉर्टी आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या डेव्हिड वेसलर यांच्या नेतृत्वातील जागतिक दर्जाची एक टीम कोविड-१९वरील प्रतिबंधात्मक उपचार म्हणून किंवा पोस्ट एक्सपोजर थेरपी म्हणून वापरल्या जाऊ शकणार्या तटस्थ प्रतिपिंडे (न्यूट्रल अँटीबॉडीज) शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.
लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी (बर्कले लॅब) अॅडव्हान्सड लाइट सोर्सने (एएलएस) एकत्रित केलेल्या डेटानुसार, सार्समधून बरे झालेल्या रुग्णांमधील अँटीबॉडीज इतर लोकांना दिल्यास त्यांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सार्स कोव्ह २ तसेच इतर कोरोना विषाणूंचा प्रवेश रोखण्याचे काम या अँटीबॉडीज करतात. याच आठवड्यात नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनावर मात करणारा अँटीबॉडी क्लिनिकल ट्रायल्सच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे शात्रज्ञांनी म्हटले आहे.