2019, 2021 दरम्यान, जन्मलेल्या प्रत्येक हजार मुलांमागे एक वर्षांखालील 35 मुलांचा मृत्यू झाला. 2015-16 मधील हजार मुलांच्य जन्मांमागे 41 बालमृत्यूंपेक्षा 15 टक्के कमी आहे. भारतातील सरासरी नवजात मृत्यू दर (NMR), नुसार जीवनाच्या पहिल्या 28 दिवसांत प्रत्येक हजार जन्मांमागे मृत्यू आहे. भारतात 2015-16 मधील जवळपास 30 मृत्यूंवरून 2019-21 मध्ये घट होऊन 25 वर आला आहे. जर आपण प्रत्येत राज्याचा विचार केला तर, सर्वाधिक घट सिक्कीममध्ये दिसून आली, तर त्रिपुरामध्ये सर्वाधिक बालमृत्यूची वाढ झाली.
बालमृत्यू दराबाबत (IMR) हे केवळ वैद्यकीय घटकांना श्रेय दिले जाऊ शकत नाही. ज्यात आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, प्रसूतीपूर्व/गर्भधारणा काळजी, मातांचे आरोग्य, प्रसवोत्तर काळजी, लसीकरण, एकूणच प्रतिबंधात्मक आरोग्य प्रणाली, सामाजिक समस्या, कुपोषण, स्वच्छतेवर आधारीत आहे. भारतात सरासरी IMR, म्हणजेच प्रत्येक हजार मुलांच्या जन्मांमागे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी. काही राज्यांमध्ये दुर्दैवाने यात वाढ झाली आहे. सर्वात कमी बालमृत्यू दर असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम, पुडुचेरी, केरळ तसेच गोवा यांचा समावेश होतो.
भारतात, दरवर्षी सुमारे 26 दशलक्ष मुले जन्माला येतात. 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 13% मुलांचा (0-6 वर्षे ) वाटा आहे. नॅशनल हेल्थ मिशन (NHM) अंतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम सर्वसमावेशकपणे बालकांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करते. तसेच पाच वर्षांखालील मृत्युदरात योगदान देणाऱ्या घटकांना मार्गदर्शन करते. आईचे आरोग्य चांगले असेल तर, बालमृत्यू दरात घट होऊ शकते. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी काळजी घेण्यावर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत भर दिला जात आहे. या अंर्तगत चांगल्या आरोग्य सुविधा घरपोच पुरवणे तसेच चांगल्या सुविधा बालमातांना आणि बालकांना उपलब्ध करून देणे आहे.
NHM व्यतिरिक्त भारत सरकारने देशातील माता तसेत बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने विविध नवीन योजना सुरू केल्या आहेत. भारतीयांच्या पिढीला निरोगी बनवण्यासाठी अत्यावश्यक सेवांचा एक भाग आहे. बालकांची तसेच बालमाताची सतत काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अतिदुर्गम भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरून या कार्यक्रमांच्या प्रभाव अधिक प्रभावीपणे करता येईल. दरवर्षी जगातील वार्षिक बालजन्मापैकी जवळपास एक पंचमांश मुले भारतात जन्मतात. त्यापैकी दर एका मिनिटाला एका बाळाचा मृत्यू होतो. माता मृत्यूंपैकी जवळपास 46 टक्के तसेच नवजात बालकांच्या मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू प्रसूतीदरम्यान किंवा जन्मानंतर पहिल्या 24 तासांत होतात. प्री-मॅच्युरिटी (35 टक्के), नवजात मुलांना संक्रमण (33 टक्के), जन्म श्वासोच्छवास त्रास होणे (20 टक्के) जन्मजात विकृती (9 टक्के) ही नवजात मृत्यूची प्रमुख कारणे आहेत.
प्रसूतीदरम्यान, तसेच नंतर होणारे बालमृत्यू टाळता येऊ शकतात. जन्मानंतर गोवर, आजार तसेच इतर प्रतिबंधक लसमुळे बालमातामृत्यू झपाट्याने कमी होता आहेत. भारतातील जवळपास ३.५ दशलक्ष मुले वेळे आगोदरच जन्माला येतात. त्यापैकी १.७ दशलक्ष बालकांना जन्मजात दोष असतो. दहा लाख नवजात बालकांना दरवर्षी विशेष नवजात केअर युनिट (SNCUs) मधून डिस्चार्ज दिला जातो. या नवजात बालकांना मृत्यू, स्टंटिंग आणि विकासात विलंब होण्याचा धोका असतो. भारताने नवजात मृत्यूदर कमी करण्यात प्रगती केली आहे. जागतिक मृत्यूदर 1990 मध्ये नवजात मृत्यूच्या एक तृतीयांश होता. तो आज एकूण नवजात बालकांच्या मृत्यूंच्या एक चतुर्थांश इतका खाली आला आहे. सन 2000 च्या तुलनेत 2017 मध्ये भारतात दर महिन्याला सुमारे एक दशलक्ष कमी नवजात मृत्यू तसेच दहा हजार माता मृत्यू कमी झाले आहेत. भारतात दशकापूर्वी, दहापैकी सहा महिलां त्यांच्या घरी प्रसूती झाल्या आहेत. आरोग्य सुविधेत झालेल्या बदलामुळे 10 पैकी 8 महिलांची प्रस्तुती रुग्णालयात होत आहे.
देशात केवळ 42 टक्के माता स्तनपानाची सुरुवात लवकर करतात. श्वासोच्छवासामुळे होणारे मृत्यू हे देशभरातील अभावी आरोग्यसेवेमुळे होत आहेत. अतिदुर्गम भागात हच प्रमाण अधिक दिसून येते. नवजात बाळाच्या आयुष्यातील पहिले 28 दिवस महत्वाचे असतात. बालमृत्यू कमी करण्यात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र, मुलींच्या जन्माबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. देशातील SNCU मुळे नवजात मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये, विशेषत: बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये, मुलींची योग्य काळजी घेतली जात नाही. मोफत सेवेची उपलब्धता असूनही, SNCU मध्ये निम्म्याहून कमी (41 टक्के) प्रवेश मुलींचे आहेत. भारत हा जगातील एकमेव मोठा देश आहे जिथे मुलाच्या तुलनेत मुलींचा मृत्यू अधिक प्रमाणात होतो.