नवी दिल्ली -अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीने आपले अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांचीच अधिकृत घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकृती भाषण देऊन हॅच कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिका कायद्याचे जाणकार भारतीय वकिल सुरत सिंह म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅच कायद्याचे उल्लंघन केले नसून त्यांनी फक्त अमेरिका सरकारच्या नियमांचे उल्लघंन केले आहे.
1939 हॅच कायदा हा (राष्ट्रध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना वगळून ) शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजकारणातील सहभागावर निर्बंध घालणारा आहे. हा कायदा 2 ऑगस्ट 1939 ला तयार करण्यात आला आहे. या कायद्याचे नाव न्यू मँक्सिकोचे सिनेटर कार्ल हॅच यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. बराक ओबामा राष्ट्रध्यक्ष असताना या कायद्यामध्ये 2012 ला सुधारणा करण्यात आली होती.